Shree Ganesha | बुधवारी गणेशाची पूजा का करावी, जाणून घ्या…

बुधवारी गणेशाची पूर्ण विधीवत पूजा केली जाते. भगवान गणेश भक्तांवर प्रसन्न होतात (Lord Ganesha) आणि त्यांचे दु:ख हरतात आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात.

Shree Ganesha | बुधवारी गणेशाची पूजा का करावी, जाणून घ्या...
Lord Ganesha
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 12:46 PM

मुंबई : बुधवारी गणेशाची पूर्ण विधीवत पूजा केली जाते. भगवान गणेश भक्तांवर प्रसन्न होतात (Lord Ganesha) आणि त्यांचे दु:ख हरतात आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात. हिंदू मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणे आवश्यक आहे. भगवान गणेश सर्व लोकांच्या दु:खाचा नाश करतात. मान्यता आहे की प्रथम पूजनीय गणेशाची श्रद्धापूर्वक पूजा केल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते. तसेच, घर संपत्तीने परिपूर्ण होते. त्यांच्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही (Why Should Worship Lord Ganesha On Wednesday Know The Reasons).

मान्यता आहे की गणपतीचे आशीर्वाद अत्यंत लाभदायक असतात. गणपतीची उपासना केल्यास भाविकांना अनेक फायदे होतात. बुधवारी गणेशाची पूजा का करावी, याचे कारण काय हे जाणून घेऊ.

समृद्धी

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी मिळवायची असते. गणपतीची उपासना केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि भक्त त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतात.

भाग्योदय

गणपतीची खऱ्या भक्तीभावाने उपासना केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. गणपतीची उपासना केल्यास भाग्योदय होते आणि निरोगी आयुष्य प्राप्त होते.

बुद्धिमत्ता

हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की भगवान गणेशाची उपासना केल्याने बुद्धी वाढते. ज्या भाविकांना बुद्धीमान व्हायचे आहे त्यांनी प्रत्येक बुधवारी गणेशाची पूजा-अर्चना करावी.

अडचणी होतात दूर

भगवान गणेश यांना विघ्नहर्ता म्हणतात, म्हणजेच ते आपल्या भक्तांच्या आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर करतात. एखाद्याच्या आयुष्यात अडथळे येत असतील तर त्यांनी नक्कीच गणेशाची पूजा करावी. गणपतीची उपासना केल्यास भीतीवर विजय प्राप्त होतो.

सहनशक्ती वाढते

गणपतीची पूजा केल्याने एखादी व्यक्ती आपल्या आतल्या लपलेल्या शक्तीवर लक्ष केंद्रित करु शकतो, ज्यामुळे सहनशक्ती वाढते.

ज्ञान

ज्ञान वाढवण्यासाठीही गणेशाची पूजा केली जाते. गणपतीची उपासना केल्यामुळे ज्ञान मिळवणे सोपे होते.

आत्मा शुद्ध होते

जर एखाद्या व्यक्तीने गणरायाची श्रद्धापूर्वक उपासना केली तर त्याचा आत्मा शुद्ध होतो. भाविकांच्या जीवनातून सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात, ज्याद्वारे त्यांचा आत्मा शुद्ध होतो.

Why Should Worship Lord Ganesha On Wednesday Know The Reasons

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shree Ganesha | श्री गणेशाचं खरं मुख कुठे गेलं? पौराणिक कथा काय सांगते…

जन्म घेताच भगवान कार्तिकेयचं अपहरण झालं होतं, जाणून घ्या या पौराणिक कथेबाबत…

Vinayaka Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.