Yamuna Story : देवी यमुना भगवान श्रीकृष्ण पत्नी कशी बनली? अद्भूत कहाणी वाचाच!
Yamuna katha : भारतातील पवित्र नद्यांपैकी एक म्हणजे यमुना परंतु तुम्हाला माहिती आहे का यमुना आणि श्री कृष्ण यांचे विवाह झाले होते. या मागची पौराणिक कथा आपल्या हिंदू ग्रंथांमध्ये सांगितली आहे. यमुना सूर्यदेव यांची कन्या आणि मृत्युदेवता यमराज आणि न्यायाधीश शनिदेव यांची बहीण देखील आहे.

भारतामध्ये अनेक पवित्र नद्या पाहायला मिळतात ज्यामध्ये स्नान केल्यामुळे तुमचे शुद्धीकरण होते अशी मान्यता आहे. हिंदू धर्मामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नदीला विशेष महत्त्व दिले जाते. ग्रंथांनुसार, तुम्ही तुमच्या आवघ्या आयुष्यामध्ये एकदा तरी या नदीमध्ये स्नान करावे. या नद्यांच्या परिसरामध्ये तुम्हाला एक सकारात्मक उर्जा जाणवते. तुम्ही जर गंगेच्या किंवा यमुनेच्या किनारी गेलात तर तुमच्या आयुष्यातील ताण दूर होतात आणि एक सकारात्मक उर्जा निर्माण होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का? यमुना ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. या नदीचे आगमन त्तराखंडमधील उत्तरकाशी येथील यमुनोत्री येथून होते.
धार्मिक मान्यतेनुसार, यमुना नदीला यामी आणि कालिंदी अशा नावांनी देखील ओळखले जाते. यमुना सूर्य देवाची कन्या आणि मृत्युदेवता यमराज आणि न्यायाधीश शनिदेव यांची बहीण अशी पौराणिक मान्यता आहे. पौराणिक कथांनुसार, यमुना नदीला देवीचे स्वरूप मानले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की यमुना ही कृष्णाची पत्नी कशी बनली? या मागची नेमकं पौराणिक कथा काय चला जाणून घेऊयात.
पौराणिक कथेनुसार, देवी यमुना भगवान विष्णूवर खूप प्रेम करत होती. भगवान विष्णूला प्राप्त करण्यासाठी त्यांनी अनेक जन्म कठोर तपस्या केली. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन, भगवान विष्णूने तिला द्वापार युगात कृष्ण अवतारात त्याची प्राप्ती करण्याचा आशीर्वाद दिला. जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील वासुदेव त्यांना यमुना नदी ओलांडून गोकुळला घेऊन जात होते. त्यावेळी यमुना नदीला पूर आला होता पण कृष्णाचे पाय टोपलीतून बाहेर येताच यमुनेने त्यांना स्पर्श केला. कृष्णाच्या पायाला स्पर्श करताच यमुनेचा वेग शांत झाला. दुसऱ्या एका कथेनुसार, एकदा कृष्ण आणि अर्जुन जंगलात फिरत होते. जेव्हा कृष्णाला तहान लागली तेव्हा तो पाण्याच्या शोधात पुढे गेला. त्याने एका सुंदर स्त्रीला भगवान विष्णूचे ध्यान करताना पाहिले. जेव्हा कृष्णाने तिला तिचा परिचय विचारला तेव्हा तिने सांगितले की तिला भगवान विष्णूंना भेटायचे आहे. देवी यमुना म्हणाली की आता द्वापर युग आले आहे आणि जर तिला अजूनही भगवान विष्णूचे वरदान मिळाले नाही तर ती येथे कायमची तपश्चर्या करत राहील. हे ऐकून कृष्णाने यमुनेशी ओळख करून दिली आणि तिच्याशी लग्न केले.




लग्नानंतर, कृष्णाने यमुना देवीची पूजा करण्याचा आशीर्वाद दिला. तो म्हणाला, “हे यमुना! तुमची तपश्चर्या संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणा आहे. माझ्या भक्तांनाही तुमचा आशीर्वाद नक्कीच मिळेल.” कृष्णाशी लग्न केल्यानंतर, देवी यमुना पुन्हा तिच्या मूळ मार्गावर परतली. अशाप्रकारे, देवी यमुनेच्या अटळ भक्ती आणि तपस्येमुळे तिला श्रीकृष्णाची पत्नी होण्याचे भाग्य मिळाले. त्यांची कहाणी आपल्याला प्रेरणा देते की खऱ्या भक्तीने आणि समर्पणाने काहीही साध्य करता येते.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.