On This Day : जेव्हा कसोटी खेळण्यासाठी मैदानात निघालेल्या टीमवर दहशतवादी हल्ला, 5 क्रिकेटपटू जखमी, 8 जणांचा मृत्यू

तब्बल 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (मंगळवार, 3 मार्च 2009) क्रिकेट विश्वाला हादरवून टाकणारी एक घटना घडली होती.

On This Day : जेव्हा कसोटी खेळण्यासाठी मैदानात निघालेल्या टीमवर दहशतवादी हल्ला, 5 क्रिकेटपटू जखमी, 8 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 1:32 PM

मुंबई : तब्बल 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (मंगळवार, 3 मार्च 2009) क्रिकेट विश्वाला हादरवून टाकणारी एक घटना घडली होती. या दिवसाची सकाळ नेहमीसारखीच सामान्य होती. एक संघ क्रिकेटमधील प्रतिष्ठेचा खेळ म्हणजेच कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळण्यासाठी स्टेडियमकडे जात होता. जेव्हा खेळाडूंनी भरलेली बस स्टेडियमजवळ पोहोचली, त्यानंतर तो दिवस नेहमीप्रमाणे सामान्य राहिला नाही. बस स्टेडियमजवळ पोहोचल्यानंतर तिथे जे काही घडलं, त्यानंतर हा दिवस क्रिकेट विश्वातील एक काळा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. (12 years ago, On this days terrorists attacks Sri Lankan cricket team bus at Gaddafi stadium in Lahore)

12 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पाकिस्तानातील लाहोर शहरात श्रीलंकेच्या संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा, अजंथा मेंडिस, थिलन समरवीरा, थरंगा पारनविताना आणि चामुंडा वास जखमी झाले होते. याव्यतिरिक्त 6 जवान आणि 8 नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर अनेक वर्ष पाकिस्तानात एकही आतंरराष्ट्रीय सामना खेळवला गेला नव्हता.

फेब्रुवारी 2009 मध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांमध्ये 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान पहिला कसोटी सामना कराची येथे खेळवण्यात आला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 1 मार्च ते 5 मार्च दरम्यान लाहोरमधील गदाफी स्टेडीयमवर खेळवला जात होता. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी सकाळी श्रीलंकेचा संघ हॉटेलमधून बसमार्गे गद्दाफी स्टेडियमकडे रवाना झाला. त्यानंतर मुखवटा घातलेल्या दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला, जोरदार गोळीबार सुरू केला. बसचालक खलील यांनी प्रसंगावधान दाखवत चालाखीने बस हल्ल्याच्या ठिकाणाहून बाहेर काढली आणि खेळाडूंचे प्राण वाचवले.

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींकडून बसचालकाचा सत्कार

दहशतवाद्यांनी खेळाडूंनी भरलेल्या बसवर अंदाधुंद गोळीबार सुरु केल्यानंतरही बस ड्रायव्हर खलील यांनी बस थांबवली नाही, त्यांनी बस सुरूच ठेवली. ते भरधाव वेगाने बस चालवत होते त्यामुळे अवघ्या 20 मिनिटांत बस गदाफी स्टेडियमला पोहोचली. खलील यांनी प्रसंगावधान दाखवत खेळाडूंना वाचवलं. त्यामुळे खलील यांचा श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनीदेखील सत्कार केला होता.

10 वर्षांनंतर पाकिस्ताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन

या हल्ल्यानंतर स्टेडियम वरूनच श्रीलंकेच्या खेळाडूंना एअरलिफ्ट करून एअरपोर्टवर नेलं होते आणि त्यानंतर तिथून त्यांना श्रीलंकेला रवाना केले. श्रीलंकेच्या खेळाडूंवरील हल्ल्यामुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. त्यानंतर 2019 पर्यंत कोणताही संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे.

हल्यामागचा सूत्रधार अफगाणिस्तानात ठार

दरम्यान, लष्कर-ए-झांगवी या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे समोर आले. ऑगस्ट 2016 मध्ये लाहोरमध्ये या हल्ल्यात सामील झालेल्या तीन दहशतवाद्यांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. यानंतर, ऑक्टोबरमध्ये या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार एका मिलिट्री ऑपरेशनदरम्यान पूर्व अफगाणिस्तानात ठार झाला होता. दरम्यान, श्रीलंकेच्या संघाने डिसेंबर 2019 मध्ये पुन्हा पाकिस्तान दौरा केला. उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. याच मालिकेद्वारे पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले.

इतर बातम्या

Video : ‘..खरा चॅम्पियन तेव्हाच कळतो!’, सचिन तेंडुलकरचा खास व्हिडीओ ट्वीट करत सर विवियन रिचर्ड्स यांचे गौरवोद्गार

टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करावी, अहमदाबाद पीचच्या वादानंतर शोएब अख्तरचा सल्ला

Vijay Hazare Trophy | 5 सामन्यात 3 शतक आणि 2 अर्धशतक, 18 गगनचुंबी षटकार, कोण आहे ‘हा’ फलंदाज ?

(12 years ago, On this days terrorists attacks Sri Lankan cricket team bus at Gaddafi stadium in Lahore)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.