Team India | संघात स्थान हवंय? आधी वजन कमी कर, बीसीसीआयचा ‘या’ स्टार खेळाडूला सल्ला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) शुक्रवारी घोषणा करण्यात आली. मात्र मुंबईकर पृथ्वी शॉवर निवड समितीने (Prithvi Shaw) दमदार कामगिरीनंतरही त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.

Team India | संघात स्थान हवंय? आधी वजन कमी कर, बीसीसीआयचा 'या' स्टार खेळाडूला सल्ला
Team India
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 11:56 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship 2021) आणि इंग्लंड दौऱ्याासाठी (India Tour England 2021) शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीने अनुभवी खेळाडूंसह नवख्या खेळाडूंनाही संधी दिली. बीसीसीआयने (Bcci) 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय टीम जाहीर केली. निवड समितीने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांची या दौऱ्याासाठी निवड केली. आयपीएल 2021 मध्ये झंझावाती खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) संधी मिळाली नाही. मीडिया रिपोर्टनुसार निवड समितीच्या मते पूर्णपणे फीट नाही. तसेच त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (According to the BCCI Prithvi Shaw will have to lose weight to get a place in Team India)

पृथ्वीला वजन कमी करण्याची आवश्यकता

टाइम्स ऑफ इंडियानुसार, बीसीसीआयने पृथ्वीला वजन कमी करण्यासाठी सांगितले आहे. त्यानंतरच त्याला संधी मिळेल. बीसीसीआयच्या एका सूत्राने टीईओला माहिती दिली. “पृथ्वीला त्याच्या वयाच्या तुलनेत सामन्यादरम्यान खेळपट्टीवर हव्या त्या वेगाने धावता येत नाहीये. पृथ्वी 21 वर्षांचा आहे. यासाठी पृथ्वीला वजन करणं हे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पृथ्वीला फिल्डिंग करताना संघर्ष करावा लागला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्या वरुन पृथ्वी परतला. त्यानंतर त्याने आपल्या गेमवर खूप मेहनत घेतली. पृथ्वी समोर रिषभ पंतचं उत्तम उदाहरण आहे. पंतलाही पृथ्वी सारख्याच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. पण पंतने ते आव्हान स्वीकारलं. त्यावर त्याने मात केली. जर पंत असे करु शकतो, तर पृथ्वीही करु शकतो”, अशी माहिती त्या सूत्राने दिली.

पंतचे जोरदार कमबॅक

निराशाजनक कामगिरीमुळे पृथ्वीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. त्यानंतर पृथ्वी भारतात आला. त्याने आपल्या बॅटिंगवर प्रचंड मेहनत घेतली. सचिन तेंडुलकर आणि प्रवीण आमरे यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर पृथ्वीने जबरदस्त कामगिरी केली. त्याने आपल्या नेतृत्वात विजय हजारे करंजकाचं विजेतपद मिळवून दिले.

पृथ्वीने 8 सामन्यात सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी केली. 8 सामन्यात 165.40 च्या सरासरीने 827 धावांचा रतीब घातला. यामध्ये त्याने 3 शतक आणि 1 द्विशतक झळकावलं. यातील द्विशतक हे पृथ्वीने साखळी फेरीत पुड्डेचरी विरुद्ध लगावलं होतं. तेव्हा पृथ्वीने नाबाद 227 धावांची खेळी केली होती.

आयपीएल 2021 मध्येही तडाखा

14 वा मोसम कोरोनामुळे स्थगित झाला. मात्र तोवर पृथ्वीने खेळलेल्या 8 सामन्यात 166.48 च्या स्ट्राईक रेट आणि 38.50 सरासरीने 3अर्धशतकांसह 308 धावा केल्या. 82 ही त्याची या मोसमातील हायेस्ट खेळी ठरली. पृथ्वीने या खेळीसह इंग्लंड दौऱ्यासाठी आपली दावेदारी सिद्ध केली होती. त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र त्यानंतरही पृथ्वी शॉवर निवड समितीने विश्वास दाखवला नाही.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 22 जून, साउथ्मपटन

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट आवश्यक)

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नागवासवाला.

संबंधित बातम्या :

कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावले, क्रीडा विश्वावर शोककळा

Team India | इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया ‘इतके’ दिवस क्वारंटाईन राहणार, जाणून घ्या विराटसेनेचा प्लॅन

(According to the BCCI Prithvi Shaw will have to lose weight to get a place in Team India)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.