Adidas ची स्पोर्ट्स ब्रा ची जाहीरात सापडली वादात, जाहीरातीच्या नावाखाली न्यूडिटीला प्रोत्साहन?
. कुठलही व्यक्तीगत नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे चेहरे दाखवलेले नाहीत, असं उत्तर अदिदास कंपनीकडून देण्यात आलं आहे.
मुंबई: न्यूडिटीला प्रोत्साहन देणाऱ्या अदिदास (Adidas) कंपनीच्या जाहीरातीवर यूनायटेड किंगडममधील एडव्हटायजिंग स्टँडर्ड ऑथोरिटीने बंदी घातली आहे. अदिदासच्या जाहीरातीमधून स्पष्टपणे नग्नता दाखवली जात असल्याचं ASA चं म्हणणं आहे. ASA ही स्वयंघोषित जाहीरातींचे नियमन करणारी युनायटेड किंगडममधील यंत्रणा आहे. अदिदास ही खेळाशी संबंधित साहित्य बनवणारी क्रीडा क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. ग्राहक वर्गाकडून अदिदास कंपनीच्या शू ज ला विशेष मागणी आहे. ‘सपोर्ट् इज एव्हरीथिंग’ असं अदिदासने एक नवीन अभियान सुरु केलं आहे. स्पोर्ट्स ब्रा (Sports Bra) ला प्रमोट करणं, हा अदिदासचा या जाहीरातीमागचा उद्देश आहे. एकाच साईजचे ब्रा कसे योग्य नाहीत, ते या कॅम्पेनमधून मांडण्यात आले आहे. वेगवेगळ्या साइजचे ब्रा उपलब्ध असले पाहिजेत, तसा नियम बनवला पाहिजे, असा अदिदास या मोहिमेमागे उद्देश आहे.
वेगवेळ्या ब्रा साइजची गरज का आहे?
वेगवेळ्या ब्रा साइजची गरज का आहे? ते पटवून देण्यासाठी अदिदासने एक फोटो टि्वट केला आहे. प्रत्येक महिलेला सपोर्ट आणि आराम मिळाला पाहिजे, असं अदिदासने त्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. अदिदासने वेगवेगळ्या रेंजमधले 43 स्टाइल्सचे स्पोर्ट् ब्रा आणले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलेला आराम मिळेल, असं अदिदासचं म्हणणं आहे. अदिदासने त्यांच्या टि्वटमध्येच हे सर्व सांगितलं आहे. ब्रँडइक्विटी डॉट कॉमने हे वृत्त दिलं आहे.
लहान मुलं हे फोटो पाहतात
अदिदासने फेब्रुवारी महिन्याच कॅम्पेन सुरु केलं. युनायटेड किंगडमनच्या एडव्हटायजिंग स्टँडर्ड ऑथोरिटीला एकूण 24 तक्रारी मिळाल्या. “कॅम्पेन करताना असे फोटो सार्वजनिक करु नयेत. लहान मुलं हे फोटो पाहतात” असं एका तक्रारदाराचं म्हणणं होतं. अशा कॅम्पनमधुन महिलांची प्रितमा मलिन केली जात असून तिला शरीराच्या एका भागापुरता मर्यादीत केलं जातय, असं दुसऱ्या एका तक्रारदाराचं म्हणणं होतं.
त्यांचे चेहरे दाखवलेले नाहीत
पोस्ट केलेला फोटो सर्वसमावेशकतेच प्रतिनिधीत्व करतो तसंच महिलांची प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश नाही. कुठलही व्यक्तीगत नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे चेहरे दाखवलेले नाहीत, असं उत्तर अदिदास कंपनीकडून देण्यात आलं आहे.
जाहीरातीचा फोकस ब्रा वर नसून स्तनांवर
हे टि्वट ऑर्गेनिक असून पेड नाहीय. त्यामुळे नियमांच उल्लंघन होत नसल्याने टि्वटरने हे टि्वट डिलीट केलेलं नाही. ब्रा चं प्रमोशन करणं हा या जाहीरातीमागचा प्रामाणिक उद्देश आहे. पण जाहीरातीचा फोकस ब्रा वर नसून स्तनांवर आहे. त्यामुळे ASA ने या जाहीरातीवर बंदी घातली आहे.