CSK vs KKR : CSK च्या दारुण पराभवानंतर एमएस धोनीच आपल्याच संघाबद्दल मोठं वक्तव्य, ‘या टीम सोबत…’
CSK vs KKR : आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून एमएस धोनीसाठी पुनरागमन तसं खास ठरलं नाही. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर धोनीने आपल्या टीमच्या फलंदाजीबद्दल हैराण करणारं वक्तव्य केलं आहे.

IPL 2025 चा सीजन सुरु असताना चेन्नई सुपर किंग्सने आपला कॅप्टन बदलला आहे. 11 एप्रिलला केकेआर विरुद्धच्या सामन्यात एमएस धोनीने सीएसकेच नेतृत्व केलं. वर्ष 2023 नंतर आयपीएलमध्ये पहिल्यांदा एमएस धोनीने टीमच नेतृत्व केलं. पण धोनी टीमला विजयी मार्गावर आणू शकला नाही. या सीजनमध्ये सलग पाच सामन्यात सीएसकेचा पराभव झाला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून ही टीम बाहेर होण्याचा धोका आहे. केकेआर विरुद्ध सीएसकेच्या टीमने खूप खराब प्रदर्शन केलं. त्यानंतर धोनीने आपल्याच टीमवर प्रश्न उपस्थित केलेत.
आयपीएलच्या मागच्या सीजनपासून खेळ खूप बदललाय. आता 200 धावा सामान्य झाल्या आहेत. फलंदाज मॅचच्या पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करतात. पण या सीजनमध्ये सीएसकेकडून अशी स्टार्ट बघायला मिळालेली नाही. ते खूप स्लो स्टार्ट करतात. त्यामुळे त्यांना सतत पराभवाचा सामना करावा लागतोय. केकेआर विरुद्धच्या सामन्यात सीएसकेने पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 31 धावाच केल्या होत्या. टीमच्या पराभवानंतर धोनीने एक मोठ वक्तव्य केलं आहे.
आमच्याकडे चांगले ओपनर्स आहेत, पण….
“आम्ही मोठी भागीदारी करु शकलो नाही. अजून थोड्या पार्टनरशिप, प्रयोग केले तर सर्व ठीक होईल. परिस्थिती समजून घेणं महत्त्वाच आहे. काही सामन्यात आम्ही चांगलं प्रदर्शन केलय. जो शॉट तुम्ही खेळू शकता, तो खेळा. आमच्याकडे चांगले ओपनर्स आहेत. ऑथेंटिक क्रिकेट शॉट्स खेळतात. ते स्लॉग करत नाहीत किंवा लाइन पार हिट करण्याचा प्रयत्न करत नाहीत. स्कोरबोर्डकडे पाहून स्वत:वर दबाव घेऊ नये. या लाइनअप सोबत पावरप्लेमध्ये 60 धावा करणं सुद्धा कठीण आहे” असं धोनी म्हणाला.
धोनी म्हणाला की, फक्त आजच नाही…
मोठ्या पराभवानंतर धोनी हे सुद्धा म्हणाला की, “टीमला बारकाईने विचार करण्याची, चिंतनाची गरज आहे. खेळाडूंना चूक पाहून सुधारावी लागेल. धोनी म्हणाला की, फक्त आजच नाही, या सीजनमध्ये अनेकदा गोष्टी आम्हाला हव्या तशा घडलेल्या नाहीत. आम्हाला हे पहाव लागेल, की कुठे आम्ही चूक करतोय. त्या चूका सुधाराव्या लागतील” “परिस्थिती आव्हानात्मक होती. स्कोरबोर्डवर पुरेशा धावा नव्हत्या. चेंडू थांबून येत होता. स्पिन गोलंदाजीसमोर अशा स्थितीत फलंदाजी कठीण असतं. तुम्ही विकेट गमावल्यानंतर मॅचमध्ये पुनरागमन कठीण असतं” असं धोनी म्हणाला. सीएसकेने या सामन्यात 9 विकेट गमावून 20 ओव्हर्समध्ये फक्त 103 धावा केल्या. केकेआरने 61 चेंडूत विजयी लक्ष्य गाठलं.