Team India: टीम इंडियाच्या पराभवानंतर होणार बदल, रोहित, विराट, अश्विनसारखे वरिष्ठ खेळाडू संघाबाहेर ?
दिनेश कार्तिक, आश्विन, विराट कोहली, रोहित शर्मा यांचा T20 मॅचेसाठी विचार करण्याची वेळ आली आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) लाजीरवाण्या पराभवानंतर खेळाडूंवर कालपासून चाहते टीका करीत आहेत. त्याचबरोबर अनेक माजी खेळाडूंनी सुद्धा टीम इंडियाच्या कालच्या खेळीवर टीका केली आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेक चाहत्यांनी ज्यांची कामगिरी खराब आहे, अशा खेळाडूंना काढून टाका अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने (BCCI) वरीष्ठ खेळाडूंना T20 मॅचेचमध्ये समाविष्ठ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू लवकरचं बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
दिनेश कार्तिक, आश्विन, विराट कोहली, रोहित शर्मा यांचा T20 मॅचेसाठी विचार करण्याची वेळ आली आहे. कारण बीसीसीआयने काल घेतलेल्या निर्णयामुळे या खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे. कालच्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर निराश झालेल्या रोहित शर्माचं सात्वन टीम इंडियाचे प्रशिक्षक राहूल द्रविडने केले. त्यानंतर रोहितने प्रेस कॉन्फरन्स घेतली.
यापुढे हार्दीक पांड्याला टीम इंडियाचे छोट्या फॉरमॅटमधील कर्णधार पद देण्यात येणार आहे. पुढच्या काही दिवसात ज्या खेळाडूंची कामगिरी खराब झाली आहे. तसेच जे खेळाडू वरिष्ठ आहेत, अशा खेळाडूंना बाहेर करण्यात येणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
टीम इंडियामध्ये युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. कुणाला संधी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु टीम इंडियामध्ये लवकरचं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात युवा टीम असेल.