Virat Kohli : वर्ल्डकप उंचावल्यानंतर विराट कोहलीची अनुष्कासाठी खास पोस्ट !
टीम इंडियाने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर पत्नी अनुष्का शर्मासाठी एक सुंदर चिठ्ठी लिहिली आहे. कठीण काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्याने अनुष्काचे कौतुक केले आहे.
टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतीय संघाने वर्ल्डकपवर नाव कोरलं. या विजयाचा खेळाडू, प्रशिक्षकांसह कोट्यवधि भारतीयांनी जल्लोष केला. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अंतिम सामन्यात शानदार खेळी करत भारताला विजयाच्या समीप नेले. वर्ल्डकपवर नाव कोरल्यानंतर विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासाठी खास पोस्ट लिहीत प्रेम व्यक्त केलं आहे. कठीण काळात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या अनुष्काला विजयाचं श्रेय देत त्याने तिचं कौतुक केलंय. विराटने त्याच्या इन्टाग्रामवर अनु्ष्कासोबतच एक सुंदर फोटो शे्अर करत ही पोस्ट लिहीली आहे. ‘तुझ्याशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं. हा जेवढा माझा विजय आहे, तेवढाच तुझाही आहे..’ असं लिहीत विराटने अनुष्काचे आभार मानल आहेत.
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेली अनुष्का शर्मा ही बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र असं असलं तरी सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते आणि नेहमीच चर्चेत असते. अनुष्का आणि तिचा पती, भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली हे एक आयडिअल, पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. ते नेहमी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना, सोशल मीडियावरही एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. दोघेही एकमेकांचा खंबीर आधार आहेत, हे त्यांच्या अनेक पोस्टमधून, इंटरव्ह्यूमधून स्पष्ट जाणवतं. आणि ते ओपनली मान्यही करतात. विराटचा एखदा विजय असो, चांगली खेळी असो किंवा कधी पराभवाचा सामना करावा लागला असो, अनुष्का नेहमीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली दिसते. तर अनुष्काचा नवा प्रोजेक्ट, एखादी ॲड आली किंवा तिचा वाढदिवस असो, विराट सोशल मीडियावर तिचं कौतुक करताना थकत नाही. त्यामुळे दोघांकडेही बरेच जण आदर्श कपल म्हणून पाहतात.
अनुष्काने केलं विराटचं कौतुक
आता भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यावरही विराट कोहली आणि संघाचं भरभरून कौतुक होताना दिसतंय. भारताच्या मॅचना बऱ्याच वेळेस स्टेडिअममध्ये उपस्थित राहणारी अनुष्का, अंतिम सामन्याठी मात्र आली नव्हती, पण विजयानंतर विराटने व्हिडीओ कॉल करून तिच्याशी आणि मुलांशी संवाद साधला. त्यांचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारतीय संघाचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहीली. आणि विराट कोहलीच्या शानदार परफॉर्मन्ससाठी त्याचे कौतुक करणारी तिची पोस्टही खूप गाजली.
विराटची पत्नीसाठी खास पोस्ट
त्यानंतर आता विराटनेही अनुष्कासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीली आहे. त्याने दोघांचाही एक हसरा फोटो शेअर करत, त्यामध्ये अनुष्काचं कौतुंक करत काही ओळी लिहील्या आहेत. ‘ हे सगळं (विजय) तुझ्याशिवाय जराही शक्य झालं नसतं. तुझ्यामुळे मी नेहमीच नम्र असतो, माझे पाय जमिनीवर राहण्यात तुझा मोठा वाटा आहे. हा विजय, हे यश जेवढं माझं आहे तेवढंच ते तुझंही आहे. थँक यू आणि आय लव्ह यू ❤️❤️❤️❤️❤️ ‘ अशी पोस्ट लिहीत विराटने अनुष्काला टॅग केलं आहे.
View this post on Instagram
अवघ्या ९ तासांपूर्वी लिहीलेली विराटची ही पोस्ट सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाली असून त्यावर लोकांनी प्रेमाचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या पोस्टला 80 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून हजारो जणांनी कमेंट्स विराट-अनुष्काच्या जोडीचं कौतुक करत प्रेम व्यक्त केलं आहे. अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर विराटने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली.