Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 चे जेतेपद पटकावल्यानंतर श्रीलंका टीमवर पैशांचा पाऊस, मिळाले इतके कोटी
आशिया चषकातील अंतिम सामना कोण जिंकणार याबाबत मागच्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर चालेल्या नेटकऱ्यांच्या चर्चेमध्ये अनेकांना श्रीलंका जिंकेल असं वाटतं होतं.
आशिया चषकातील (Asia Cup 2022) शेवटच्या सामन्यात चषक कोण जिंकणार अशी अवस्था होती. परंतु श्रीलंकेच्या (Shrilanka) खेळाडूंनी चांगली खेळी केल्यामुळे आशिया चषकाचे मानकरी ते साहव्यांदा झाले. राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा करीत असलेल्या श्रीलंका देशासाठी कालचा आशिया चषक अत्यंत महत्त्वाचा आहे. काल श्रीलंका टीमने पाकिस्तान (Pakistan) टीमचा 23 धावांनी पराभव केला. कालचा विजय हा श्रीलंकन क्रिकेटसाठीच नाही तर ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे.
आशिया चषकातील अंतिम सामना कोण जिंकणार याबाबत मागच्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर चालेल्या नेटकऱ्यांच्या चर्चेमध्ये अनेकांना श्रीलंका जिंकेल असं वाटतं होतं. त्याचप्रमाणे काल श्रीलंकेच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे एकहाती विजय खेचून आणला.
श्रीलंका टीम जिंकल्यानंतर खेळाडूंनी आनंद साजरा केला, श्रीलंकन प्रेक्षकांनी सुद्धा काल मैदानात मोठा जल्लोष साजरा केला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. कालच्या विजयानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंना 1.20 कोटी रुपये मिळाले. तसेच पाकिस्तानच्या टीमला 60 लाख रुपये मिळाले.
आशिया कप 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)- २८१ धावा
विराट कोहली (भारत) – २७६ धावा
इब्राहिम झद्रान (एएफजी) – १९६ धावा
सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
भुवनेश्वर कुमार (भारत) – 11 विकेट्स
वानिंदू हसरंगा (श्रीलंका)- 9 विकेट्स
शादाब खान (पाकिस्तान) – 8 विकेट (भाषेसह इनपुट)