एकीकडे आयपीएलची धामधूम, दुसरीकडे महिला टीम इंडियाचा परदेश दौराही ठरला

आयपीएल संपल्यानंतर यूएईमध्ये महिलांच्या आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे आयपीएल संपल्यानंतर भारतीय महिलांचा क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतो.

एकीकडे आयपीएलची धामधूम, दुसरीकडे महिला टीम इंडियाचा परदेश दौराही ठरला
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 11:37 AM

नवी दिल्ली : जगभरातल्या क्रिकेटरसिकांचे लक्ष सध्या युएईमध्ये (UAE) सुरु असलेल्या इंडियन प्रिमियर लीगवर (IPL) आहेत. देशभरातील कोरोनाची परिस्थिती पाहून यंदा यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. 19 सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत खेळवण्यात येईल. तब्बल सहा महिन्यांनंतर भारतीय खेळाडू मैदानात उतरले आहेत. परंतु आयपीएल संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्नदेखील अनेक क्रिकेटरसिकांना पडला आहे. (After women IPL indian women cricket teat likely to tour sri lanka)

आयपीएल संपल्यानंतर यूएईमध्ये महिलांच्या आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे आयपीएल संपल्यानंतर भारतीय महिलांचा क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सध्या या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रयत्न करत आहे. क्रिकट्रॅकरच्या माहितीनुसार बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय महिला क्रिकेट खेळाडू आयपीएलनंतर श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतात.

14 दिवस क्वारन्टाईन रहावं लागणार

श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर टीमला 14 दिवस क्वारन्टाईन रहावं लागणार आहे. या दौऱ्यात महिलांचा संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. महिलांचा संघ या श्रीलंका मालिकेसाठी खूप उत्सूक आहेत. कारण अनेक महिन्यांनंतर त्या मैदानावर उतरणार आहेत. 14 दिवसांच्या क्वारन्टाईन कालावधीनंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मालिकेला सुरुवात होईल.

श्रीलंका दौऱ्यासाठी मिताली राज उत्सूक

भारतीय महिला संघ श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची शक्यता असल्याचे कळताच भारताची स्टार खेळाडू मिताली राज म्हणाली की, खूप महिन्यांनंतर टीम इंडियाची जर्सी परिधान करणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सूक आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी होणाऱ्या महिलांच्या आयपीएलमुळे आमचा चांगलाच सराव होणार आहे. यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मी बीसीसीआयचे खूप आभार मानते.

संबध्त बातम्या 

IPL 2020 : विराट कोहली ICC चे नियम विसरला, मागितली पंचांची माफी

IPL 2020 : धोनीने ठोकलं शतक, ‘असा’ विक्रम करणारा दुसरा खेळाडू

(After women IPL indian women cricket teat likely to tour sri lanka)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.