Ind Vs Aus | एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे?

अजिंक्य रहाणेने त्याच्या शांत स्वभावामुळे, कुल अ‍ॅटिट्यूडमुळे सर्वांची मनं जिंकली आहेत.

Ind Vs Aus | एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे?
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 9:15 PM

ब्रिस्बेन : टीम इंडियाने थरारक झालेल्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने (Aus vs Ind 4th Test) शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकाही (Border Gavskar Trophy) जिंकली. टीम इंडियाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात ही मालिका जिंकली. विशेष म्हणजे रहाणेने अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या आणि युवा खेळाडूंना सोबत घेत शानदार विजय मिळवला. अजिंक्यने नेतृत्व कसं असायला हवं? याचं उत्कृष्ट उदाहरण या मालिकेतून जगासमोर मांडलं. सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत अजिंक्य फलंदाजीत त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करु कामगिरी करु शकला नाही. परंतु त्याने उत्तमपणे संघाचं नेतृत्व केलं. (Ajinkya Rahane won hearts of Indian cricket fans)

अजिंक्य त्याच्या शांत स्वभावामुळे, कुल अ‍ॅटिट्यूडमुळे, संघातील नव्या खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देत असल्यामुळे सर्वाचा आवडता क्रिकेटपटू बनला आहे. पराभूत झाल्यावर किंवा एखाद्या दिवशी वाईट खेळी खेळल्यावर तो जसा असतो अगदी तसाच वावर त्याचा शतक लगावल्यावरही असतो, त्याच्या या साधेपणावर क्रिकेटप्रेमी फिदा झाले आहेत.

तिरंगा पंतच्या हाती सोपवला

आजच्या सामन्यात रिषभ पंतने विजयी चौका मारला. सगळे खेळाडू जल्लोषात मैदानात धावले. अजिंक्यने मात्र रोहित शर्माला कडकडून मिठी मारली आणि तो पुन्हा शांत बसला. कोणताही जल्लोष नाही, नाचणं नाही, उड्या मारणं नाही. त्यानंतर सर्व खेळाडू तिरंगा घेऊन मानवंदना करण्यासाठी निघाले. टीम इंडियाच्या या हंगामी कर्णधाराने तो तिरंगा मॅच विनिंग खेळी करणाऱ्या रिषभ पंतच्या हाती दिला आणि स्वतः बाजूला झाला. अजिंक्यच्या या कृतीचं कौतुक झालं नसतं तर नवल.

सिराज-बुमराहवरील वर्णद्वेषी टीकेनंतर संयमाने परिस्थिती हाताळली

सामना संपल्यानंतर पोस्ट मॅच सेरेमनीमध्ये अजिंक्यने भारताच्या खेळाडूंचं कौतुक केलंच सोबतच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचंही कौतुक केलं. तसेच सामना पाहायला आलेल्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे आभार मानले. याच ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात भारताचे गोलंदाज मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराहवर वर्णद्वेषी टीका केली होती. परंतु अजिंक्यने त्याचा राग मनात ठेवला नाही. तसेच ज्यावेळी ही टीका झाली तेव्हा ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना उत्तर न देता केवळ पंचांकडे तक्रार केली आणि सामना थांबवला. वर्णद्वेषी टीका करणाऱ्या प्रेक्षकांना मैदानातून हाकलून देईपर्यंत सामना सुरु होऊ दिला नाही.

नॅथन लायनला दिलं खास गिफ्ट

ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनने आजच्या सामन्याद्वारे कसोटी कारकीर्दीतले 100 सामने पूर्ण केले आहेत. त्यामुळे आजच्या पोस्ट मॅच सेरेमनीमध्ये अजिंक्यने सर्व खेळाडूंच्या सहीसह एक भारतीय टीमची जर्सी नॅथन लायनला गिफ्ट केली.

जबाबदारी घेण्यासाठी पुढे, क्रेडिट घेण्याच्या वेळी मागे

बॉर्डर गावसकर चषक अजिंक्यच्या हाती सोपवल्यानंतर त्या चषकासोबत फोटोसेशन करण्याऐवजी रहाणेने तो चषक थेट नवोदित खेळाडून टी. नटराजनकडे सोपवला आणि फोटोसेशनवेळी बाजूला उभा राहिला. (साधारणपणे कर्णधाराच्या हाती चषक दिल्यानंतर कर्णधार तो चषक उंचावतो, त्यासोबत फोटोसेशन करतो आणि नंतर तो चषक घेऊन आपल्या संघाकडे जातो.) दररोज मैदानात कर्णधार म्हणून उतरला तरी अजिंक्यच्या चेहऱ्यावर कोणताही गर्व नसतो. माज तर अजिबातच नसतो, संघाची धुरा मात्र तो समर्थपणे सांभाळतो. त्याच्या या कृतीचं कौतुक तर होणारच. दरम्यान, याच अजिंक्यला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी आयपीएल 2020 स्पर्धेत डावललं गेलं होतं. दिल्लीच्या संघाने अजिंक्यला केवळ 6-7 सामन्यांमध्येच संधी दिली होती.

संबंधित बातम्या

England Tour India | ऑस्ट्रेलियाला धुतलं, आता इंग्लंडला लोळवण्यासाठी भारताचा तगडा संघ सज्ज

सिराज-शार्दुलचा भेदक मारा, पंतचा तडाखा आणि पुजाराची झुंज; भारताच्या विजयाची 5 कारणं

“सौ शहरी… एक संगमनेरी”, अहमदनगरी ‘अजिंक्य’साठी काँग्रेस नेत्याचं हटके ट्विट

जे धोनी-कोहली आणि द्रविडसाठी अशक्य ते रिषभ पंतने करुन दाखवलं

(Ajinkya Rahane won hearts of Indian cricket fans)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.