माझ्यासाठी दुआ करा, पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला कोरोना

"प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी यासाठी तुमच्या प्रार्थना आवश्यक आहेत, इंशाअल्लाह" असे ट्वीट शाहीद आफ्रिदीने केले आहे. (All rounder Pakistan Cricketer Shahid Afridi tested COVID Positive)

माझ्यासाठी दुआ करा, पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला कोरोना
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 3:28 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. खुद्द आफ्रिदीनेच आपण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. (All rounder Pakistan Cricketer Shahid Afridi tested COVID Positive)

प्रकृती बिघडल्यामुळे शाहीद आफ्रिदीने ‘कोरोना’ चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, असे आवाहन आफ्रिदीने ट्विटरवरुन केले.

“गुरुवारपासून माझी तब्येत ठीक नव्हती; माझे अंग खूप दुखत होते. माझी चाचणी घेण्यात आली आहे आणि दुर्दैवाने मी कोविड पॉझिटिव्ह निघालो. प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी यासाठी तुमच्या प्रार्थना आवश्यक आहेत, इंशाअल्लाह” असे ट्वीट शाहीद आफ्रिदीने केले आहे.

पाकिस्तानात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच आफ्रिदी पाकिस्तानमधील गरीब आणि गरजू नागरिकांना सतत मदत करत होता. तो आपल्या टीमसह पाकिस्तानच्या विविध भागात मदत साहित्य पुरवत होता.

धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जाणारा शाहीद आफ्रिदी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर सेकंड इनिंगमध्ये आपल्या बेधडक वक्तव्यांमुळेही तो चर्चेत राहिला आहे.

हेही वाचा : पाक क्रिकेट बोर्डाने बलात्काराचे खोटे आरोप लावून मला संघाबाहेर काढले : शोएब अख्तर

आफ्रिदीने यापूर्वी काश्मीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त भाष्य केले होते, त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्याशी संबंध तोडले.

शाहीद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

40 वर्षीय शाहीद आफ्रिदीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत चढउतार राहिले आहेत. फॉर्म न गवसल्यामुळे बर्‍याच वेळा त्याला संघातून बाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 398 वनडे, 99 टी20 आणि 27 कसोटी सामने खेळले. आफ्रिदीने (476) तीनही आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये ख्रिस गेल (534) नंतर सर्वाधिक षटकार लगावले आहेत.

(All rounder Pakistan Cricketer Shahid Afridi tested COVID Positive)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.