Aman Sehrawat : अमनच पण विनेशसारखं झालेलं, 10 तासात त्याने कसं कमी केलं 4.5 किलो वजन

Aman Sehrawat : भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने शुक्रवारी रात्री ब्रॉन्ज मेडल मिळवलं. हरियाणाच्या या कुस्तीपटूने देशाला आणखी एक मेडल मिळवून दिलं. या विजयानंतर आता एक खुलासा झाला आहे. ब्रॉन्ज मेडल मॅचआधी अमनच वजन 4.5 किलो जास्त होतं. त्याचही विनेश फोगाट सारख होण्याचा भिती होती. मग, त्याने कसं वजन कमी केलं?

Aman Sehrawat : अमनच पण विनेशसारखं झालेलं, 10 तासात त्याने कसं कमी केलं 4.5 किलो वजन
Aman SehrawatImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 12:40 PM

भारताचा अवघ्या 21 वर्षांचा कुस्तीपटू अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी रात्री इतिहास रचला. अमनने 57 किलो वजनी गटात ब्रॉन्झ मेडल मिळवलं. अमनने या सामन्यात पुर्तो रिकोच्या कुस्तीपटूवर एकतर्फी 13-5 असा विजय मिळवला. अमनच्या विजयानंतर एक खुलासा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार अमन सेहरावतच वजन सुद्धा विनेश फोगाट सारख वाढलं होतं.

अमन सेहरावतच सेमीफायनलमध्ये पराभव झाला, त्यावेळी त्याचं वजन 4.5 किलो जास्त होतं. पण अमन आणि सपोर्ट स्टाफने मिळून ब्रॉन्झ मेडल मॅचआधी हे वाढलेलं वजन कमी केलं. जपानी कुस्तीपटूविरोधात सेमीफायनल मॅच हरल्यानंतर अमनच वजन करण्यात आलं. वजन 61.5 किलो होतं. अमन 57 किलो वजनी गटात खेळतोय.

हातात फक्त 10 तास

4.5 किलो वजन जास्त होंत. त्यानंतर कोच जागमंदर सिंह आणि वीरेंद्र दहिया यांनी एकूण 6 सदस्यीय टीमसोबत मिळून अमनच वजन कमी करण्याच मिशन सुरु केलं. त्यांच्या हातात फक्त 10 तास उरलेले.

अमनने वजन कमी करण्यासाठी काय-काय केलं?

अमन सेहरावतकडून आधी दीड तास मॅट सेशन करुन घेतलं. यात त्याला उभं राहून रेसलिंग करायला लावली.

त्यानंतर अमन सेहरावतने एक तासात हॉट बाथ सेशन केलं.

रात्री 12 वाजल्यानंतर अमनने जीममध्ये 1 तास ट्रेडमिल मशीनवर रनिंग केली.

अमनला विश्रांतीसाठी फक्त अर्ध्या तासाची वेळ देण्यात आली. त्यानंतर 5-5 मिनिटांचे सौना बाथचे 5 सेशन दिले. अशा प्रकारे त्याचं वजन 3.6 किलो कमी झालं.

अखेरीस अमनला मसाज थेरपी देण्यात आली. त्यानंतर त्याने हलकी जॉगिंग केली आणि 15 मिनिटांच रनिंग सेशन.

इतक्या मेहनतीनंतर सकाळी 4.30 वाजता अमनच वजन 56.9 किलो भरलं. म्हणजे मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम कमी होतं.

विनेश फोगाटच्या बाबतीतही हेच झालं. 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम जास्त वजन भरल्याने तिला फायनल खेळता आली नाही. त्याशिवाय तिच हक्काच मेडलही गेलं.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.