अर्जुन तेंडुलकरवर 20 लाखांची बोली, कोणत्या संघाकडून खरेदी?

Arjun Tendulkar bid ipl auction | माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात सामावून घेतलं आहे.

अर्जुन तेंडुलकरवर 20 लाखांची बोली, कोणत्या संघाकडून खरेदी?
अर्जुंन तेंडुलकर
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 8:30 PM

Arjun Tendulkar bid ipl auction चेन्नई : आयपीएल लिलावात अनेक खेळाडू कोट्यवधींची उड्डाणं घेत आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) संघातून मुक्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवर (Glenn Maxwell) तगडी बोली लागली. विराट कोहलीच्या बंगळुरुने तब्बल 14.25 कोटींची बोली लावून, ग्लेन मॅक्स्वेलला आपल्या ताफ्यात घेतलं. तर दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने (Chris Morris) आयपीएलच्या हंगामात (IPL Auction) इतिहास रचला आहे. ख्रिस मॉरिसला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली (Chris Morris IPL bid price) लागली आहे. ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. या लिलावात माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) याचादेखील समावेश करण्यात आला होता. या लिलावात मुंबई इडियन्सने अर्जुनवर बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. (Arjun Tendulkar sold to Mumbai Indians in IPL Auction 2021 live, price team bid)

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी केलं आहे. अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) नुकताच मुंबईच्या सीनियर टीममधून (वरीष्ठ संघाकडून) त्याचा टी-20 डेब्यू केला आहे. अर्जुनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. याआधी तो 2018 मध्ये भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा भाग होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळावी, यासाठी अर्जुन प्रयत्न करत राहिला. 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. यापूर्वी तो इंग्ल्डंमध्ये क्लब क्रिकेट खेळला आहे. दरम्यान, मुंबईच्या संघासाठी डेब्यू करणाऱ्या अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे.

दरम्यान, गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 10.60 कोटी रुपये खर्च करुन तीन नवे गोलंदाज ताफ्यात सामावून घेतले आहेत. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी अजून मजबूत झाली आहे. तीन नव्या गोलंदाजांसह मुंबईचा संघ सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. (IPL Auction 2021 Mumbai Indians buy 3 new bowlers)

10.60 कोटींमध्ये तीन नवे गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात

लिलावापूर्वी मुंबईकडे 15 कोटी 35 लाख रुपयांची राशी उपलब्ध होती. मुंबईचा संघ त्यांच्या ताफ्यात 7 नवे खेळाडू समावून घेऊ शकतो. त्यापैकी 10.60 कोटी रुपये मुंबईने खर्च केले आहेत आणि यात मुंबईने तीन नवे गोलंदाज संघात घेतले आहेत. सर्वात आधी मुंबई इंडियन्सने न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज अॅडम मिल्ने याला संघात सामावून घेतलं आहे. मिल्नेसाठी मुंबईने तब्बल 3.20 कोटी रुपये मोजले आहेत. अॅडमसाठी सुरुवातीला राजस्थान रॉयल्स आणि मुंबईमध्ये चुरस सुरु होती. त्यानंतर यामध्ये सनरायझर्स हैदराबादने उडी घेतली. अखेर ही स्पर्धा मुंबईने जिंकली. मुंबईने 3.20 कोटी रुपयांच्या बोलीवर अॅडम मिल्ने याला ताफ्यात सामावून घेतले.

कुल्टर नाईल आणि पियुष चावला मुंबईच्या ताफ्यात

अॅडमनंतर मुंबईने गेल्या महिन्यात संघमुक्त केलेल्या (रिलीज केलेल्या) नॅथन कुल्टर नाईल याला पुन्हा एकदा खरेदी केलं आहे. मुंबईच्या संघाने कुल्टर नाईलला 5 कोटी रुपयांच्या बोलीवर संघात पुन्हा सामावून घेतलं आहे. कुल्टर नाईलनंतर मुंबईने भारतीय फिरकीपटू पियुष चावला यालादेखील संघात सामावून घेतलं आहे. पियुषसाठी मुंबई इंडियन्सने तब्बल 2.40 कोटी रुपये मोजले आहेत. मुंबईची फलंदाजी मजबूत आहेच. त्यामुळे मुंबईचे संघमालक आज गोलंदाजांची खरेदी करण्यासाठीच लिलावाला उपस्थित होते. मुंबईने आज केवळ आतापर्यंत गोलंदाजांवरच बोली लावली आहे.

हेही वाचा

Chris Morris | बेस प्राईज अवघी 75 लाख, मात्र ख्रिस मॉरिसला IPL इतिहासातील सर्वात मोठी किंमत!

मोईन अलीसाठी चेन्नईची तिजोरी खाली, इंग्लिश खेळाडूसाठी मोजले इतके कोटी

विराट कोहलीच्या बंगळुरुने पेटारा उघडला, ग्लेन मॅक्स्वेलसाठी मोजले 14,25,00,000 रुपये

(Arjun Tendulkar sold to Mumbai Indians in IPL Auction 2021 live, price team bid)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.