Asia Cup 2022 : आसिफ अलीला आयसीसीकडून शिक्षा, जाणून घ्या काय केलीये कारवाई
पाकिस्तान जिंकल्यानंतर मॅच पाहायला आलेल्या पाकिस्तानच्या प्रेक्षकांना अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आशिया चषकातील (Asia Cup 2022) सामने सुरु झाल्यापासून प्रत्येक खेळाडू चर्चेत आहे. कारण आशिया चषकात प्रत्येक सामन्यात रंगत पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत खेळाडूंचे अनेक वाद देखील व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहेत. पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afganistan) यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूने बाद झाल्यानंतर समोर असलेल्या फरीद अहमदला बॅट दाखवली. खेळाडूंनी त्यावेळी मध्यस्थी केल्यामुळे ते प्रकरण तेवढ्या पुरतं थांबलं. त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई करण्याची मागणी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डकडून करण्यात आली होती.
The fight between Asif Ali and the Afghan bowler? Very unfortunate
हे सुद्धा वाचा#PAKvAFG pic.twitter.com/45i0MJaBHs
— Rana Raheel Abbas (@RanaRaheelAbbas) September 7, 2022
सामना कोण जिंकेल अशा स्थितीत असताना आसिफ अलीला अफगाणिस्तानच्या बॉलरने बाद केले. त्यानंतर दोघांत बाद झाला. आसिफ अलीने बॅट उगारल्याचं टिव्हीवरती सगळ्या जगाने पाहिलं. त्याचबरोबर सोशल मीडियावर आसिफ विरोधात अनेक मॅसेज पाहायला मिळाले. फरीद अहमदच्या बाजूने अनेक मॅसेज पाहायला मिळाले.
आयसीसीने दोन्ही खेळाडूंवरती कारवाई केली आहे. ही कारवाई आर्थिक स्वरुपात करण्यात आली आहे. दोन्ही खेळाडूंना मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे. त्यामुळे आता पुन्हा सोशल मीडियावर याची चर्चा सुरु झाली आहे.
पाकिस्तान जिंकल्यानंतर मॅच पाहायला आलेल्या पाकिस्तानच्या प्रेक्षकांना अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.