AUS vs IND Test Series | हिटमॅन रोहित शर्मासह टीम इंडियाचे अन्य 4 खेळाडू आयसोलेट

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात तिसरा कसोटी सामना हा 7 जानेवारीला खेळण्यात येणार आहे.

AUS vs IND Test Series | हिटमॅन रोहित शर्मासह टीम इंडियाचे अन्य 4 खेळाडू आयसोलेट
हिटमॅन रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 6:38 PM

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने शानदार विजय (india beat australia in 2nd test) मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. हिटमॅन रोहित शर्मा (rohit sahrma) क्वारंटाईन कालावधीनंतर टीम इंडियाशी जोडला गेला आहे. रोहितमुळे टीम इंडियाला मजबूती मिळाली आहे. तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया नेट्समध्ये कसून सराव करत आहे. दरम्यान टीम इंडियाच्या एकूण 5 खेळाडूंना आयोसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (aus vs india test series Five Indian cricketers with Rohit Sharma in isolation)

नक्की काय घडलं ?

नववर्षानिमित्त टीम इंडियाचे एकूण 5 खेळाडू हे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. यामध्ये रोहित शर्मा , शुभमन गिल, प्रथ्‍वी शॉ, ऋषभ पंत आणि नवदीप सैनीचा समावेश होता. नववर्षानिमित्त हे 5 भारतीय खेळाडू मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. यावेळेस नवलदीप सिंह या चाहत्याने या खेळाडूंसह फोटो काढले. चाहत्याने भारतीय खेळाडूंसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर या खेळाडूंकडून कोरोना नियमांचे उल्लंघन झाले का, या बाबतची तपासणी करण्यात आली.

या 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना धोका निर्माण होऊ नये म्हणून ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाच्या वैदयकीय पथकाच्या सल्ल्यानुसार या पाचही जणांना आयसोलेट ठेवण्यात आलं आहे. तसेच या खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन झालं का, याबाबतही चौकशी केली जात आहे. तसेच या पाचही जणांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते.

5 खेळाडूंना सराव करता येणार का ?

या 5 खेळाडूंना आयसोलेट केलं आहे. यामुळे या खेळाडूंना सराव करता येणार का, असा सवाल क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आयसोलेट केलं असलं तरी या खेळाडूंना सराव करता येईल, अशी माहिती ऑस्ट्रेलियाने क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

पाकिस्तानी खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान टीमच्या खेळाडूंनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं होतं. हे खेळाडू विनामास्क फिरताना तसेच हॉटेल कर्मचाऱ्यांकडून जेवण स्वीकारताना सीसीटीव्हीमध्ये आढळले होते. वारंवार इशारा देऊनही हे पाकिस्तानी खेळाडू सुधारले नाही. त्यामुळे परत कोरोना नियमांच उल्लंघन केल्यास पाकिस्तानला पाठवू, अशी तंबी न्यूझीलंडच्या वैद्यकीय पथकाने दिली होती. यानंतर पाकिस्तानचे खेळाडू वठणीवर आले.

संबंधित बातम्या : 

Australia vs India | ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा तिसऱ्या कसोटीबाबत मोठा निर्णय

(aus vs india test series Five Indian cricketers with Rohit Sharma in isolation)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.