130 कोटी भारतीयांच्या जिव्हारी लागलेला ‘तो’ पराभव अजूनही डोक्यात, टीम इंडियाच्या रणरागिनी बदला घेणार का?

टी 20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या जेतेपदासाठी चार संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा यात समावेश आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे.

130 कोटी भारतीयांच्या जिव्हारी लागलेला 'तो' पराभव अजूनही डोक्यात, टीम इंडियाच्या रणरागिनी बदला घेणार का?
T20 World Cup स्पर्धेत भारताच्या वाघिणी ऑस्ट्रेलियाच वचपा काढणार!तेव्हा तोंडचा घास हिरावून नेला होता
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 2:31 PM

मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. आता जेतेपदासाठी चार संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा यात समावेश आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत चार पैकी चार सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर भारताने चार पैकी तीन सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. साखळी फेरीत इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव केला होता. तसं पाहिलं उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच जेतेपदांवर नाव कोरलं आहे. तर गेल्या टी 20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे पहिल्या वहिल्या जेतेपदाचं भारतीय वाघिणींचं स्वप्न भंगलं होतं.आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीय संघाला चालून आली आहे.

काय झालं होतं टी 20 वर्ल्डकप 2020 स्पर्धेत

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 184 धावा केल्या आणि विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ 99 या धावसंख्येवर बाद झाला. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.

ऑस्ट्रेलिया आणि भारताची टी 20 स्पर्धेतील स्थिती

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. दोन्ही संघ पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 4 वेळा भारताला पराभूत केलं आहे. फक्त एका सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. मागचे सलग तीन सामने भारताने गमावले आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघावर दबाव दिसून येत आहे.

उपांत्य फेरीचे सामने

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (23 फेब्रुवारी 2023, गुरुवारी)
  • इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (24 फेब्रुवारी 2023, शुक्रवार)
  • अंतिम फेरीचा सामना 26 फेब्रुवारी 2023, रविवार

भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे

ऑस्ट्रेलियन संघ- बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम, मेगन स्कूट

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.