AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aus vs Ind 4th Test, 4th Day | चौथ्या दिवसखेर टीम इंडियाच्या बिनबाद 4 धावा, विजयासाठी आणखी 324 धावांची आवश्यकता, सामना रंगतदार स्थितीत

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे.

Aus vs Ind 4th Test, 4th Day |  चौथ्या दिवसखेर टीम इंडियाच्या बिनबाद 4 धावा, विजयासाठी आणखी 324 धावांची आवश्यकता, सामना रंगतदार स्थितीत
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया
| Updated on: Jan 18, 2021 | 1:26 PM
Share

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 4th Test) यांच्यातील चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. टीम इंडियाने बिनबाद 4 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने दुसऱ्या डावात 4 धावा केल्या. यामुळे भारताला विजयासाठी आणखी 324 धावांची आवश्यकता आहे. उद्याचा 19 जानेवारी हा या सामन्याता अंतिम दिवस असणार आहे. यामुळे हा सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. (australia vs india 2020 21 4th test at brisbane day 4 live cricket score updates online in marathi at the gabba) लाईव्ह स्कोअरकार्ड 

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना दुसऱ्या डावात 294 धावांवर रोखलं. यामध्ये मोहम्मद सिराजने 5, तर शार्दुल ठाकूरने 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपल्यानंतर टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात झाली. मात्र फक्त 1.5 चेंडूच्या खेळानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. पाऊस अखेरपर्यंच थांबलाच नाही. त्यामुळे टीम इंडियाला चौथ्या दिवसखरे बिनबाद 4 धावाच करता आल्या.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या. तर भारताला पहिल्या डावात 336 धावांवर रोखलं. यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने या आघाडी व्यतिरिक्त एकूण 294 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाला 328 धावांचे आव्हान मिळाले. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 48 धावा केल्या. मोहम्मद सिराजने टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने 4 खेळाडूंना माघारी पाठवलं.

सामना रंगतदार स्थितीत

टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवशी विजयासाठी 324 धावांची आवश्यकता आहे. तर 10 विकेट्स हातात आहेत.रोहित शर्मा, रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे. या फलंदाजांनी आवश्यक त्या वेगाने धावा केल्यास हा सामना भारताला जिंकता येऊ शकतो. तसेच ऑस्ट्रेलियालाही हा सामना जिंकण्याची संधी आहे. यामुळे हा सामना नक्की कोणाच्या बाजूने जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

(australia vs india 2020 21 4th test at brisbane day 4 live cricket score updates online in marathi at the gabba)  स्कोअरकार्ड 

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.