Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

| Updated on: Apr 15, 2021 | 3:34 PM

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिलेले आहे.

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

ब्रिस्बेन : रिषभ पंतने केलेल्या तडाखेदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने रंगतदार झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग तिसरा म्हणजेच हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत म्हत्वाची भूमिका बजावली. पंतने निर्णायक 89 धावांची नाबाद खेळी केली. (australia vs india 2020 21 4th test at brisbane day 5 live cricket score updates online in marathi at the gabba)

टीम इंडियाने चौथी कसोटी जिंकली

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने फंलदाजीला सुरुवात केली. मार्क्स स्टोयनिस आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने 89 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी शार्दुल ठाकूरने मोडीत काढली. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना ठराविक अंतराने धक्के दिले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथने 55 धावांची खेळी केली. तर वॉर्नरने 48 धावा केल्या. याव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना मोठी खेळी करण्यापासून रोखले. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर बॅटिंगने कमाल केल्यानंतर शार्दुलने बोलिंगनेही धमाल केली. शार्दुलने 4 विकेट्स घेतल्या. तर नटराजनने 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांवर आटोपला. यामुळे भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान मिळाले.

टीम इंडियाचा पहिला डाव

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने एकूण 336 धावा केल्या. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील फलंदाजीला सुरुवात झाली. पहिल्या डावात टीम इंडियाच्या टॉपच्या फलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. ऑस्ट्रेलियाला 100 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळण्याची शक्यता होती.

186-6 अशी टीम इंडियाची स्थिती झाली. मात्र यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर या जोडीने सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांच्या खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 336 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला 33 धावांचीच आघाडी मिळाली. शार्दूल ठाकूरने 67 तर सुंदरने 62 धावा केल्या. तसेच सलामीवीर रोहित शर्माने 44 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 108 धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार टीम पेनने 50 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाला फार होत खोलू दिले नाही. टीम इंडियाकडून पहिल्या डावात थंगारासू नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंजर या तिकडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने एका फलंदाजाला माघारी धाडलं.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Jan 2021 01:18 PM (IST)

    टीम इंडियाचा 3 विकेट्सने विजय

    रंगतदार झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने कांगारुंवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. रिषभ पंतने निर्णायक क्षणी केलेल्या 89 धावांची नाबाद खेळी केली. तसेच युवा सलामीवीर शुभमन गिलने 91 धावांची खेळी केली. तसेच चेतेश्वर पुजारानेही अर्धशतकी खेळी केली.

  • 19 Jan 2021 12:45 PM (IST)

    टीम इंडियाला विजयासाठी 49 चेंडूत 51 धावांची आवश्यकता

    टीम इंडियाला विजयासाठी 49 चेंडूत 51 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानात खेळत आहेत. सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

  • 19 Jan 2021 12:23 PM (IST)

    टीम इंडियाला पाचवा धक्का, मयांक अग्रवाल आऊट

    टीम इंडियाला मयांक अग्रवालच्या रुपाच पाचवा धक्का बसला आहे. यामुळे सामना आणखी रंगतदार स्थितीत आला आहे. आता मैदानात रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर खेळत  आहेत.

  • 19 Jan 2021 12:09 PM (IST)

    पंतचे तडाखेदार अर्धशतक , सामना रंगतदार स्थितीत, विजयासाठी 73 धावांची आवश्यकता

    टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतने तडाखेदार अर्धशतक लगावलं आहे. यामुळे सामना रगंतदार स्थितीत आला आहे. टीम इंडियाला विजयासाठी 73 धावांची आवश्यकता आहे. मैदानात रिषभ पंत आणि मयांक अग्रवाल खेळत आहेत.

  • 19 Jan 2021 11:48 AM (IST)

    टीम इंडियाला चौथा धक्का

    टीम इंडियाला चौथा धक्का बसला आहे. अर्धशतकी खेळीनंतर चेतेश्वर पुजारा आऊट झाला आहे. पुजाराने 211 चेंडूत 56 धावा केल्या. दरम्यान आता रिषभ पंत आणि मयांक अगरवाल खेळत आहेत.

  • 19 Jan 2021 11:28 AM (IST)

    पुजाराचे अर्धशतक पूर्ण

    टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराने अर्धशतक लगावलं आहे. पुजाराचं कसोटीतील हे 28 वं अर्धशतक ठरलं आहे.

  • 19 Jan 2021 11:08 AM (IST)

    टीम इंडिया 200 पार

    टीम इंडियाने 200 धावा पूर्ण केल्या आहेत. यामुळे विजयासाठी भारताला आणखी 128 धावांची आवश्यकता आहे. मैदानात रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा खेळत आहेत. शेवटच्या काही षटकांचा खेळ बाकी आहे. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.

  • 19 Jan 2021 10:23 AM (IST)

    टीम इंडियाच्या चहापानापर्यंत 3 बाद 183 धावा

    टीम इंडियाच्या चहापानापर्यंत 3 बाद 183 धावा झाल्या आहेत.  त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आणखी 145 धावांची आवश्यकता आहे.  मैदानात रिषभ पंत 1o  आणि चेतेश्वर पुजारा 43 धावांवर नाबाद खेळत आहेत. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. सर्व भारतीय चाहत्यांना रिषभ पंतकडून अपेक्षा आहेत. त्यामुळ टी ब्रेकनंतर पंत नक्की कसा खेळ करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

  • 19 Jan 2021 09:42 AM (IST)

    शुभमन गिलचं शतक हुकलं, 91 रन्सवर आऊट

  • 19 Jan 2021 09:41 AM (IST)

    शुभमन गिलचं शतक हुकलं

  • 19 Jan 2021 07:20 AM (IST)

    शुभमन गिलचं अर्धशतक

  • 19 Jan 2021 07:11 AM (IST)

    Aus vs Ind 4th Test, 5th Day | भारताचं अर्धशतक, पुजारा-गिल जोडी मैदानात

  • 19 Jan 2021 07:09 AM (IST)

    रोहित शर्मा 7 रन्सवर आऊट, पॅट कमिन्सचा शिकार

Published On - Jan 19,2021 1:18 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.