AUS vs IND, 2nd Test | टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, उमेश यादव लंगडत लंगडत मैदानाबाहेर
टीम इंडियासाठी वाईट बातमी.
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test )यांच्यातील दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया आघाडीवर आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात शानदार फलंदाजीनंतर दमदार गोलंदाजी करतायेत. मात्र अशात टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीदरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीमुळे उमेशला मैदानाबाहेर जावं लागले आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. (australia vs india 2nd test Umesh Yadav leaves the field with an injury )
Umesh Yadav complained of pain in his calf while bowling his 4th over and was assessed by the BCCI medical team. He is being taken for scans now. #AUSvIND pic.twitter.com/SpBWAOEu1x
— BCCI (@BCCI) December 28, 2020
नक्की काय झालं?
उमेश सामन्यातील 8 वी ओव्हर टाकत होता. उमेशने या ओव्हरचा तिसरा चेंडू टाकला. यानंतर उमेश रनअपमध्ये लगंडताना दिसला. उमेशला हॅमस्ट्रिंग इंज्युरीचा त्रास जाणवला. यामुळे तडक टीम इंडियाचे फिजीओ मैदानात आले. या दुखापतीमुळे उमेशला मैदानाबाहेर जावे लागले. यामुळे ही उर्वरित ओव्हर मोहम्मद सिराजने पूर्ण केली.
This doesn't look good for Umesh Yadav. He's pulled up gingerly and is hobbling off the field #AUSvIND pic.twitter.com/ncOESNol2m
— 7Cricket (@7Cricket) December 28, 2020
India's Umesh Yadav leaves the field with an injury ?
?Watch Day 3 #AUSvIND Test on Fox Cricket or Kayo: https://t.co/V275n130EX
?Live blog: https://t.co/IvPwkpYEjb
?Match Centre: https://t.co/hSscBuONMn pic.twitter.com/ZSwxbamCVU
— Fox Cricket (@FoxCricket) December 28, 2020
उमेश आता वैदयकीय पथकाच्या निगराणीखाली आहे. उमेश यादवची आवश्यक ती चाचणी केली जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. मात्र उमेशला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याबाबत काहीच माहिती नाही. मात्र जर उमेशची दुखापत गंभीर असल्यास टीम इंडियासाठी ही वाईट बातमी ठरेल. कारण आधीच टीम इंडियाचे इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे स्टार गोलंदाज दुखापतीमुळे कसोटी मालिकेबाहेर झाले आहेत.
दरम्यान त्याआधी उमेश गोलंदाजी करताना चांगल्या लयीत दिसत होता. उमेश ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातील फलंदाजीदरम्यान पहिला धक्का दिला. उमेशने जो बर्न्सला 4 धावांवर विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं.
संबंधित बातम्या :
Australia vs India | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे मुख्य गोलंदाज मालिकेबाहेर
(australia vs india 2nd test Umesh Yadav leaves the field with an injury )