Australia vs India Test | मोबाईल बंद ठेवा, बाहेरील चर्चांकडे दुर्लक्ष करा, मोहम्मद कैफचा टीम इंडियाला सल्ला
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने मात केली.
मुंबई : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (Australia vs India 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने दुसऱ्या डावात केवळ 36 धावा केल्या. पराभव आणि दुसऱ्या डावातील निच्चांकी धावसंख्या यावरुन टीम इंडियावर चांगलीच टीका करण्यात आली. पराभवामुळे टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यातील संघ निवडीवरुनही टीका केली गेली. टीम इंडियाच्या खेळाडूंना या सामन्यात चांगली कामगिरी करता आला नाही. त्यात नेटीझन्सकडून टीका करण्यात येतेय. आजी माजी खेळाडूंकडून या कामगिरीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे टीम इंडियाचं काही प्रमाणात मानसिक खच्चीकरण झालं. मात्र टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) महत्वाचा सल्ला दिला आहे. Australia vs India Test Turn off mobile ignore outside discussions Mohammad Kaif advice to Team India
कैफ काय म्हणाला?
कैफने ट्विटद्वारे टीम इंडियाला सल्ला दिला आहे. फोन बंद करा. बाहेर होणाऱ्या चर्चेकडे दुर्लक्ष करा. एक टीम म्हणून एकत्र रहा आणि पुढे पाहा. टीम इंडियाला अडचणीतून बाहेर पडण्यासाठीचा हा एकमेव पर्याय आहे, असं ट्विट करत कैफने टीम इंडियाला प्रोत्साहन वजा सल्ला दिला आहे.
Switch off the phones, shut out the noise, stick together as a group and look ahead, that is the only way to get out of this right now for India. @ajinkyarahane88 needs to gather the group together and stamp his leadership going forward #hanginthere #AusvInd #cricket
— Mohammad Kaif (@MohammadKaif) December 19, 2020
“अजिंक्य रहाणे विराटच्या अनुपस्थितीत पुढील 3 सामन्यात नेतृत्व करणार आहे. रहाणेकडे टीमला एकत्र आणण्याची आवश्यकता आहे. तसेच रहाणेला स्वत:चं सिद्ध करण्याची जबाबदारी असेल”, असंही कैफने ट्विटमध्ये म्हटलं. विराटची पत्नी अनुष्का गर्भवती आहे. जानेवारी 2021 मध्ये अनुष्का गोंडस बाळाला जन्म देणार आहे. यामुळे विराटने पहिल्या सामन्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेतला. विराट मंगळवारी (22 डिसेंबर) भारतात परतेल, अशी शक्यता आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी मोठे बदल
भारतीय फलंदाजांनी पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी मोठे बदल केले जाणार आहेत. टीममध्ये एकूण 4 बदल केले जाऊ शकतात. यामध्ये पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिल, रिद्धीमान साहाच्या जागी ऋषभ पंत, हनुमा विहारीऐवजी रवींद्र जाडेजाला, तसेच दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा बॉक्सिंग डे क्रिकेट सामना असणार आहे. ही मॅच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एकमेव खेळाडूला मॅन ऑफ द मॅच म्हणून खास मेडल देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
Australia vs India 2nd Test | ‘बॉक्सिंग डे’ सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ खेळाडूला मिळणार खास मेडल
Australia vs India 2nd Test | “टीम इंडिया अडचणीत, मदतीसाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा”
Australia vs India | ऑस्ट्रेलियातून निघण्याआधी विराटची सहकाऱ्यांसोबत विशेष बैठक, ‘या’ विषयावर चर्चा
Australia vs India Test Turn off mobile ignore outside discussions Mohammad Kaif advice to Team India