AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगरला उपरती, म्हणतात ‘आता भारताला कधीच कमी समजणार नाही!’

ऑस्ट्रेलियाच्या झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगर यांना उपरती झाली आहे. आतापासन आम्ही कधीच भारताला कमजोर समजणार नाही, असं लँगर म्हणाले.

पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगरला उपरती, म्हणतात 'आता भारताला कधीच कमी समजणार नाही!'
| Updated on: Jan 20, 2021 | 6:49 AM
Share

ब्रिस्बेन : टीम इंडियाने थरारक झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने (Aus vs Ind 4th Test) शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकाही (Border Gavskar Trophy) जिंकली. टीम इंडियाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात ही मालिका जिंकली. विशेष म्हणजे रहाणेने अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या आणि युवा खेळाडूंना सोबत घेत शानदार विजय मिळवला. टीम इंडियाच्या युवासेनेने कांगारुंना बॅटिंग आणि बोलिंगने चांगलं रडवलं. ऑस्ट्रेलियाच्या झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगर यांना उपरती झाली आहे. आतापासन आम्ही कधीच भारताला कमजोर समजणार नाही, असं लँगर म्हणाले आहेत. (Australian Coach Justin langer appriciate indian Cricket team After india Create history)

“आमच्यासाठी ही खूप मोठी टेस्ट सिरीज होती. एखाद्या टेस्ट मॅचमध्ये तुम्ही 36 रन्सवर ऑलआऊट होता आणि त्यानंतर तुम्ही कमबॅक करुन 2-1 अशी मालिका जिंकता. आज टेस्ट क्रिकेट जिंकलं. पहिली गोष्ट म्हणजे कधीही कुणाला हलकं समजता कामा नये. आजपासून आम्ही भारताला कधीही कमजोर समजणार नाही”, असं लँगर म्हणाले.

“भारताची जेवढी चारीफ करावी तेवढी कमी आहे. पहिली मॅच तीन दिवसांत हरल्यावनर देखील भारताने जिद्द सोडली नाही. त्यांनी मालिकेत शानदार पुनरागमन केलं. जेव्हा तुमचे जाडेजा आणि बुमराह असे दिग्गज खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेले असतात तेव्हाही युवा खेळाडूंना घेऊन भारताने जी कामगिरी करुन दाखवली आहे ती अजोड आहे”, अशी स्तुतीसुमने लँगर यांनी भारतीय संघावर उधळली.

“भारतीय संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऋषभ पंतने जी 89 रन्सची इनिंग खेळली ती अप्रतिम होती. मला ऋषभची खेळी बघून हेडिंग्लेमधली बेन स्टोक्सची खेळी आठवली. तसंच नवख्या शुभमन गीलनेही कमाल बॅटिंग केली”, असं लँगर म्हणाले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं. विराट पहिल्या सामन्यानंतर भारतात परतला. त्यामुळं अजिंक्यकडे नेतृत्वाची जबाबदारी आली. दुखापत टीम इंडियाची पाठ सोडायला तयार नव्हती. त्यात पहिला सामना भारताने गमावला होता. यामुळे टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पिछाडीवर होती. रहाणेच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी होती. रहाणेने ही जबाबदारी एक फलंदाज आणि कर्णधार अशी दुहेरी भूमिका सार्थपणे पार पाडली. तसेच त्याने नवख्या खेळाडूंना विश्वासात घेतले. रहाणेने आपल्या सहकाऱ्यांना आपला नैसर्गिक खेळ करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्याने योग्य वेळी योग्य गोलंदाजीची निवड केली. अचूक फिल्ड सेट केली. अंतिमत: भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 2-1 ने धूळ चारली आणि करोडो भारतसावियांना विजयाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली. (Australian Coach Justin langer appriciate indian Cricket team After india Create history)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.