ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल क्लिन बोल्ड, भारतीय परंपरेनुसार साखरपुडा

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल हा भारतीय तरुणीसोबत लग्न करणार असल्याने जोरदार चर्चेत (Glenn maxwell and vini raman enagement) आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल क्लिन बोल्ड, भारतीय परंपरेनुसार साखरपुडा
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 9:12 PM

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल हा भारतीय तरुणीसोबत लग्न करणार असल्याने जोरदार चर्चेत (Glenn maxwell and vini raman enagement) आहे. ग्लेनने नुकतेच प्रेयसी विनी रमनसोबत भारतीय परंपरेनुसार साखरपुडा केला. याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले (Glenn maxwell and vini raman enagement) आहेत.

गेल्या महिन्यातच ग्लेनने प्रेयसी विनासोबत साखरपुडा केला होता. पण पुन्हा भारतीय पद्धतीने ग्लेन आणि विनीने साखरपुडा केला आहे. विनी रमनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. ग्लेन मॅक्सवेलने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती. तर विनी रमनने ब्लॅक रंगाचा लेहंगा घातला होता.

“भारतीय परंपरेनुसार ग्लेन आणि मी साखरपुडा केला आहे. या साखरपुड्यात त्याचे मित्र आणि कुटुंबातीलही सहभागी होते”, असं विनीने सांगितले.

ग्लेन आणि त्याची प्रेयसी विनी रामन (Australian cricketer glenn maxwell with vini raman) गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. विनी आणि ग्लेन इन्स्टाग्राम अकाऊंटवरही विनी नेहमी एकमेकांचे फोटो पोस्ट करत असतात. ग्लेन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. नुकतेच ग्लेनने क्रिकेट विश्वातून ब्रेक घेतला आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ग्लेनने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे त्याच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. ग्लेनची तब्येत ठीक असून तो सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.

ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न केले, तर तो ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेटनंतर भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न करणारा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरेल.

विनी ही भारतीय वंशाची आहे. पण गेले काही वर्ष ती ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्य करत आहे. विनी मेलबर्नमध्ये सेटल आहे. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार ती फार्मासिस्ट आहे. विनी रामनने आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवर ग्लेनसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.