Moeen Ali | मोईन अली क्रिकेटर नसता, तर ISIS मध्ये असता, तस्लिमा नसरीन यांचं ट्वीट डीलीट, वाद कायम
टीकेची राळ उठल्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी आपलं ट्वीट उपरोधिक असल्याचं स्पष्टीकरण दिलं. (Taslima Nasreen ISIS Moeen Ali )
मुंबई : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings CSK) स्टार मोईन अली (Moeen Ali) याच्याविषयी वक्तव्यावर टीका झाल्यानंतर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी ट्वीट डीलीट करत आपलं वक्तव्य उपरोधिक असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. नसरीन यांच्या ट्विटनंतर जगभरातील क्रिकेटपटूंनी टीकेची झोड उठवली होती. “जर मोईन अली क्रिकेटमध्ये नसता, तर नक्कीच सिरीयाला जाऊन आयसिसला जॉईन झाला असता” असं ट्वीट तस्लिमा नसरीन यांनी केलं होतं. (Author Taslima Nasreen ISIS remark on English Cricketer Moeen Ali sparks outrage)
काय होतं तस्लिमा नसरीन यांचं ट्वीट?
तस्लिमा नसरीन यांच्या ट्वीटवरुन वादळ निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र क्रिकेट विश्वातील हरहुन्नरी क्रीडापटूचा थेट दहशतवादी संघटनेशी संबंध जोडल्याने जगभरातील चाहते खवळले आहेत. “मोईन अली क्रिकेटमध्ये अडकला नसता, तर नक्कीच सिरीयाला जाऊन आयसिसमध्ये सहभागी झाला असता” अशा अर्थाचं ट्वीट तस्लिमा नसरीन यांनी केलं होतं. त्यानंतर जोफ्रा आर्चर, सॅम बिलिंग्ज, बेन डकेट, साकिब महमूद यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी टीका केली होती. त्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट डीलीट केलं.
टीकेची राळ उठल्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी आपलं ट्वीट उपरोधिक असल्याचं स्पष्टीकरण दिलं. “विरोधकांना हे चांगलंच माहित होतं की माझं मोईन अलीविषयीचं ट्वीट उपरोधिक आहे. मात्र त्यांनी मला त्रास देण्यासाठी जाणूनबुजून हा टीकेचा मुद्दा बनवला. कारण मी मुस्लिम समाजाला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) करण्याचा प्रयत्न करते आणि इस्लामिक धर्मांधतेला विरोध करते” असे स्पष्टीकरण नसरीन यांनी दिले.
तस्लिमा नसरीन यांचे स्पष्टीकरण
Haters know very well that my Moeen Ali tweet was sarcastic. But they made that an issue to humiliate me because I try to secularize Muslim society & I oppose Islamic fanaticism. One of the greatest tragedies of humankind is pro-women leftists support anti-women Islamists.
— taslima nasreen (@taslimanasreen) April 6, 2021
(Author Taslima Nasreen ISIS remark on English Cricketer Moeen Ali sparks outrage)
इंग्लंडचा क्रिकेटपटू जोफ्रा आर्चरची पुन्हा टीका
Sarcastic ? No one is laughing , not even yourself , the least you can do is delete the tweet https://t.co/Dl7lWdvSd4
— Jofra Archer (@JofraArcher) April 6, 2021
मोईन अलीला आयपीएलमध्ये डिमांड
तब्बल 7 कोटी रुपयांची बोली लावून चेन्नई सुपरकिंग्सने मोईन अलीला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. मोईन अलीची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. त्याच्यावर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नईने मोठमोठी बोली लावली होती. अखेर चेन्नईने 7 कोटी रुपयांमध्ये मोईन अलीला त्यांच्या ताफ्यात सामावून घेतलं.
संबंधित बातम्या :
इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीला कोरोना, श्रीलंकेत संसर्ग
मोईन अलीसाठी चेन्नईची तिजोरी खाली, इंग्लिश खेळाडूसाठी मोजले इतके कोटी
(Author Taslima Nasreen ISIS remark on English Cricketer Moeen Ali sparks outrage)