IND vs UAE : खरच मानलं, आयुषने हवेत अशी डाइव्ह मारली की, सगळेच थक्क, एकदा VIDEO बघा
IND vs UAE : या मॅचमध्ये भारतीय खेळाडू आयुष बदोनीने एक थक्क करणारा झेल पकडला. हा कॅच पाहून सगळेच हैराण झालेत. रमनदीप सिंहच्या चेंडूवर यूएईचा फलंदाज मुहम्मद जवादुल्लाहने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.
ACC T20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 मध्ये टीम इंडियाचा दबदबा आहे. भारतीय टीमने सलग दोन सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाने दुसरा ग्रुप स्टेजचा सामना संयुक्त अरब अमिराती टीम विरुद्ध खेळला. या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार प्रदर्शनाच्या बळावर 7 विकेटने सामना जिंकला. या मॅचमध्ये भारतीय खेळाडू आयुष बदोनीने एक थक्क करणारा झेल पकडला. हा कॅच पाहून सगळेच हैराण झालेत.
टीम इंडियाच्या खेळाडूंनी या सामन्यात दर्जेदार फिल्डिंग केली. संयुक्त अरब अमिराती विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची टॉप फिल्डिंग दिसून आली. आयुष बदोनीने इनिंग दरम्यान अशी कॅच पकडली सगळेच थक्क झाले. रमनदीप सिंहच्या चेंडूवर यूएईचा फलंदाज मुहम्मद जवादुल्लाहने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मुहम्मद जवादुल्लाहने समोर मोठा फटका मारला. आयुष बदोनी लॉग-ऑनवर उभा होता. चेंडू त्याच्यापासून लांब होता. आयुष बदोनीने चपळाईने झेप घेऊन कॅच पकडली. त्याचे हे एफर्ट पाहून सगळेच हैराण झाले.
रमनदीपने सुद्धा अशीच कॅच घेतलेली
आयुष बदोनीच्या आधी मागच्या सामन्यात रमनदीप सिंहने सुद्धा अशीच जबरदस्त कॅच घेतली होती. रमनदीप सिंहने बाऊंड्री लाइनवर डाइव्ह मारुन एकाहाताने कॅच पकडली होती. संयुक्त अरब अमिराती विरुद्ध सुद्धा या खेळाडूंनी चांगली फिल्डींग केली. एकूण 7 कॅच पकडले. आयुष बदोनीने या सामन्यात टीम इंडियासाठी विनिंग रन्स काढला. 9 चेंडूत 12 धावा बनवून तो नाबाद राहिला. यात 1 चौकार आणि 1 षटकार आहे.
𝐅𝐥𝐢𝐠𝐡𝐭 𝐦𝐨𝐝𝐞 🔛
A super catch by Ayush Badoni! 👐@BCCI#MensT20EmergingTeamsAsiaCup2024 #ACC pic.twitter.com/imOQae1Xu6
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 21, 2024
टीम इंडियाला किती रन्सच टार्गेट?
या मॅचमध्ये UAE च्या टीमने टॉस जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली. 16.5 ओव्हरमध्ये संपूर्ण टीम 107 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाला विजयासाठी 108 धावांची गरज होती. टीम इंडियाने फक्त 10.5 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठलं. सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.