‘मला विराट कोहलीची विकेट घ्यायचीय’, बांगलादेशची महिला क्रिकेटपटू जहाआरा आलमचं स्वप्न

बांगलादेशची महिला क्रिकेटपटू जहाआरा आलमलाही अशीच कामगिरी करत विराट कोहलीला बाद करायचं आहे (Bangladesh women Cricketer want Virat Kohli wicket).

'मला विराट कोहलीची विकेट घ्यायचीय', बांगलादेशची महिला क्रिकेटपटू जहाआरा आलमचं स्वप्न
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 4:50 PM

ढाका : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली सध्या जगभरातील सर्वात घातक फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावावर क्रिकेटमधील अनेक विक्रमांची नोंद आहे. कोणत्याही गोलंदाजासाठी कोहलीची विकेट घेणं मोठी कामगिरी असते. बांगलादेशची महिला क्रिकेटपटू जहाआरा आलमलाही अशीच कामगिरी करत विराट कोहलीला बाद करायचं आहे (Bangladesh women Cricketer want Virat Kohli wicket).

विराट वनडे सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर, तर कसोटीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. 86 कसोटी सामन्यांमध्ये विराटने 27 शतकं लगावली. 248 एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या नावावर 43 शतकं आहेत. विराटने आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावले आहेत.

बांगलादेशची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू जहाआरा आलमने नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत अष्टपैलू फलंदाज विराट कोहलीला बाद करण्याचं स्वप्न बोलून दाखवलं. यावेळी तिने आयपीएलमधील आपल्या आवडीच्या संघाचीही माहिती दिली.

ती म्हणाली, “आयपीएलमध्ये माझा आवडता संघ कोलकाता नाईट रायडर्स आहे. मला विराट कोहलीला बाद करायचं आहे. ईडन गार्डन्स मैदानावर खेळण्याचंही माझं स्वप्न आहे. आतापर्यंत मला ईडन गार्डन्सवर खेळण्याची संधी मिळालेली नाही. एक दिवस मला नक्की खेळण्याची संधी मिळेल अशी मला आशा आहे. यासोबतच लॉर्ड्सच्या मैदानावर खेळण्याचंही माझ स्वप्न आहे. क्रिकेटमधील अनेक मोठे खेळाडू या मैदानावर खेळले आहेत. मलाही तेथे खेळायचं आहे.”.

“कोलकाता नाईट रायडर्स माझा आवडीचा आयपीएल क्रिकेट संघ आहे (Kolkata Knight Riders). शाकिब अल हसन सनरायजर्स हैदराबादसाठी खेळत होते, तेव्हा मी सनरायजर्स हैदराबादलाही पाठिंबा दिला. यावेळी आयपीएलमध्ये कोणीही बांगलादेशी खेळाडू नाही. तरी मी कोलकाता नाईट रायडर्सलाच पाठिंबा देईल. मला कोलकाता नाईट रायडर्स संघ का आवडतो हे माहिती नाही. मात्र, आयपीएल सुरु झाल्यापासून मला तो संघ आवडतो,” असं जहाआरा आलमने सांगितलं.

जहाआरा आलम बांगलादेश महिला क्रिकेटची मोठी ओळख

27 वर्षीय जहाआरा आलम बांगलादेश महिला क्रिकेटची प्रसिद्ध खेळाडू आहे. तिने 2011 मध्ये बांगलादेशसाठी एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत तिने 34 एकदिवसीय आणि 41 टी-20 सामने खेळले. जहाआरा आलमच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 29 आणि टी-20 सामन्यात 28 विकेटची नोंद आहे.

2010 आशियन गेम्समध्ये बांगलादेशने चीनचा पराभव केला तेव्हा जहाआरा संघात सहभागी होती. ती पहिल्यांदाच महिला आशिया करंडक जिंकणाऱ्या टिमचाही भाग होती. टी-20 सामन्यात 5 विकेट घेणारी ती बांगलादेशची पहिली महिला गोलंदाज आहे. याशिवाय 2018 मध्ये तने आयसीसी टी-20 महिला विश्वकप स्पर्धेत 4 सामन्यांमध्ये 6 विकेट घेतल्या होत्या. त्या मालिकेत तिला ICC ने ‘स्टँडआऊट’ खेळाडू घोषित केलं होतं.

हेही वाचा :

‘आपदा को अवसर में बदल डाला’, युजवेंद्र चहलच्या साखरपुड्यावर सेहवागसह चाहत्यांकडून मीम्सचा पाऊस

गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण….. : शोएब अख्तर

Rohit Sharma | ‘मुंबई इंडियन्स’मध्ये ‘त्या’ दोन खेळाडूंना परत आणू इच्छितो : रोहित शर्मा

Bangladesh women Cricketer want Virat Kohli wicket

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.