विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर, वेळापत्रक जारी
मुंबई : विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कार्यक्रम जाहीर झालाय. 14 जुलै रोजी विश्वचषकाचा अंतिम सामना होईल. बीसीसीआयकडून सप्टेंबरपासून ते मार्च 2020 पर्यंतचं वेळापत्रक जारी करण्यात आलंय. यामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, वेस्ट इंडिज, झिम्बाम्ब्वे हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर येईल. भारत पुढच्या काही महिन्यांमध्ये मायदेशातच जास्तीत जास्त […]
मुंबई : विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कार्यक्रम जाहीर झालाय. 14 जुलै रोजी विश्वचषकाचा अंतिम सामना होईल. बीसीसीआयकडून सप्टेंबरपासून ते मार्च 2020 पर्यंतचं वेळापत्रक जारी करण्यात आलंय. यामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, वेस्ट इंडिज, झिम्बाम्ब्वे हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर येईल. भारत पुढच्या काही महिन्यांमध्ये मायदेशातच जास्तीत जास्त मालिका खेळणार आहे. बीसीसीआयकडून 5 कसोटी, 9 वन डे आणि 12 टी-20 सामन्यांचं वेळापत्रक जारी करण्यात आलंय.