IPL 2020 | बीसीसीआयकडून प्ले-ऑफचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ ठिकाणी होणार अंतिम सामना

प्ले-ऑफमध्ये स्थान बनवण्यासाठी अनेक संघात कडवी झुंज पाहायला मिळत आहे.

IPL 2020 | बीसीसीआयकडून प्ले-ऑफचे वेळापत्रक जाहीर, 'या' ठिकाणी होणार अंतिम सामना
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 12:52 AM

मुंबई : आयपीएलचा 13 वा (IPL 2020) मोसम रंगतदार स्थितीत आला आहे. प्ले ऑफमधील (IPL Play Offs 2020) स्थान निश्चित करण्यासाठी प्रत्येक टीममध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. रविवारी (25 ऑक्टोबर) डबल हेडर सामने खेळेले गेले. यामधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस यांच्यात खेळण्यात आला. तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून बंगळुरु आणि मुंबईला प्ले ऑफमध्ये धडक मारण्याची संधी होती. मात्र बंगळुरुने चेन्नईला आणि राजस्थानने मुंबईला पराभूत केलं. त्यामुळे अजूनही कोणत्याच संघाला प्ले ऑफमधील स्थान कायम करता आलेलं नाही. दरम्यान बीसीसीआयने आज (25 ऑक्टोबर) आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या प्ले ऑफचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. तसेच यासोबत बीसीसीआयने महिला WOMEN’S T20 चॅलेंज 2020 या स्पर्धेच्या ठिकाणांची माहिती जाहीर केली आहे. Bcci Has Announced The Schedule And Venue For The Ipl 2020 Play Offs And Venues For The Women’s T20 Challenge

बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार आयपीएलचा अंतिम सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

असे आहे प्ले-ऑफचे वेळापत्रक

क्वालिफायर 1 – 5 नोव्हेंबर (दुबई) एलिमिनेटर- 6 नोव्हेंबर (अबुधाबी) क्वालिफायर 2- 8 नोव्हेंबर (अबुधाबी) फायनल-10 नोव्हेंबर (दुबई)

IPL 2020 PLAY OFF TIME TABLE AND VENUE

ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 14 गुणांसह अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या 3 संघांना प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी केवळ 1 विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे प्ले ऑफसाठी 3 संघ जवळपास निश्चित आहेत. मात्र 4 थ्या क्रमांकासाठी कोलकाता, पंजाब आणि राजस्थान यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. पंजाबने या स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी 3 संघांमध्ये तगडे आव्हान असणार आहे.

तसेच बीसीसीआयने प्ले ऑफसह आणि महिलांच्या टी 20 चॅलेंज 2020 च्या स्पर्धेचे ठिकाणही जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसाआयने या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर केलं होतं. मात्र ठिकाण जाहीर केलं नव्हतं. या स्पर्धेतील सर्व सामने शारजा स्टेडियमवर खेळण्यात येणार आहेत.

असं आहे टी 20 स्पर्धेचं वेळपत्रक

WOMENS T 20 CHALLENGE VENUE

पहिला सामना : सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी, शारजा, 4 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

दुसरा सामना : वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स, 5 नोव्हेंबर, शारजा, दुपारी 3:30 वाजता

तिसरा सामना : ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज – 7 नोव्हेंबर, शारजा, संध्याकाळी 7:30 वाजता

फायनल: 9 नोव्हेंबर, शारजा, संध्याकाळी 7:30 वाजता

असे आहेत संघ

सुपरनोवाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमह रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेलमॅन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका, मुस्कान मलिक

ट्रेलब्लेझर्स : स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पुनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलथा, नुझत परविन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्लेस्टोन, नाथकं चाणथम, डीन्ड्रा डॉटिन, काश्वी गौतम

वेलोसिटी : मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ति , शैफाली वर्मा, सुषमा वर्मा (विकेटकीपर), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देव्या वैद्य, सुष्री दिब्यादर्शिनी, मनाली दक्षिणिणी, लीघ कास्पेरेक, डॅनियल व्यान लुस, जहाँआरा आलम आणि एम अनघा

संबंधित बातम्या :

Women’s T20 Challenge | BCCI कडून महिला आयपीएल संघाची घोषणा, या दिवसापासून रंगणार स्पर्धा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Bcci Has Announced The Schedule And Venue For The Ipl 2020 Play Offs And Venues For The Women’s T20 Challenge

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.