Wriddhiman Saha: द्रविड, गांगुली विरोधात बोलणाऱ्या ऋद्धिमान साहाला BCCI विचारणार जाब
अलीकडेच विकेटकिपर फलंदाज ऋद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) मनातील खदखद व्यक्त केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड न झाल्यामुळे साहाने आपला संताप व्यक्त केला होता.

मुंबई: अलीकडेच विकेटकिपर फलंदाज ऋद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) मनातील खदखद व्यक्त केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड न झाल्यामुळे साहाने आपला संताप व्यक्त केला होता. त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) तसंच भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर निशाणा साधला होता. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या दोन्ही व्यक्तींवर त्याने टीका केली होती. ऋद्धिमान साहाने केलेली ही वक्तव्य म्हणजे BCCI कडून करण्यात येणाऱ्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचे उल्लंघन आहे. बीसीसीआयने साहा बरोबर केलेल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार तो ग्रुप बी मध्ये येतो. या गटातील खेळाडूंना रिटेन करण्यासाठी तीन कोटी रुपये दिले जातात. ऋद्धिमान साहाने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील नियम 6.3 चे उल्लंघन केलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
काय आहे सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील 6.3 नियम
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील 6.3 नियमानुसार, “खेळाडूने खेळ, पदाधिकारी, सामन्यादरम्यान घडलेल्या घटना, टेक्नोलॉची वापर, संघ निवड किंवा अन्य बाबींवर कुठलेही भाष्य करु नये. खेळाडूची अशी वक्तव्य खेळाच्या हिताची नाहीत”
संघ निवडीबद्दल कसं काय भाष्य केलं?
ऋद्धिमान साहाने हेड कोच राहुल द्रविड, चेतन शर्मा आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबरोबर झालेला खासगी संवाद उघड केला. संघात स्वत:ची निवड झाली नाही, त्या बद्दलही भाष्य केलं. “सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग असतानाही संघ निवडीबद्दल कसं काय भाष्य केलं? या बद्दल बीसीसीआयकडून ऋद्धिमान साहाला विचारणा होऊ शकते” असं अरुण धुमल यांनी पीटीआयला सांगितलं.
द्रविड बरोबर झालेला साहाने संवाद सार्वजनिक करु नये, असं बीसीसीआयमधील अनेकांच मत होतं. कारण त्यामुळे राहुल द्रविडच्या प्रतिमेला धक्का बसला.
राहुल द्रविड काय म्हणाले?
ऋद्धीमान साहाने खासगी संवाद जाहीर केला, असला तरी त्यावर मी अजिबात दु:खी नाहीय, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.“ऋद्धीमानच्या वक्तव्याचं मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. भारतीय क्रिकेटमध्ये ऋद्धीमानचं योगदान आणि त्याच्या कामगिरीचा मला आदर आहे. भविष्याबद्दल त्याला स्पष्टता असली पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं” असं राहुल द्रविडने सांगितलं.
BCCI May Ask Wriddhiman Saha To Explain Breach Of Central Contract Clause With Comments On Sourav Ganguly Rahul Dravid