IPL 2021 | आतापर्यंत 3 खेळाडूंना कोरोना, बीसीसीआय ‘हे’ मोठं पाऊल उचलण्याची शक्यता

खेळाडूंच्या आरोग्याची काळजी म्हणून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्वांना कोरोना लस देण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. (bcci corona vaccination ipl 14)

IPL 2021 | आतापर्यंत 3 खेळाडूंना कोरोना, बीसीसीआय 'हे' मोठं पाऊल उचलण्याची शक्यता
IPL
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 6:12 PM

नवी दिल्ली : IPL 2021 चा 14 वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 9 एप्रिलला आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाईल. मात्र आयपीएलच्या 14 व्या हंगामावर कोरोनाचा सावट आले आहे. या कारणामुळे खेळाडूंच्या आरोग्याची काळजी म्हणून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्वांना कोरोना लस देण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केली जाणार आहे. याविषयी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. (BCCI may conduct Corona vaccination drive to all cricketers who will play in 14 edition of IPL)

महिनाभराआधी खेळाडूंना कोरोना प्रतिंबधक लस देण्यावर चर्चा झाली होती. मात्र, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगूली यांनी असे काहीही नसल्याचे सांगून सध्यातरी तशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले होते. पण आता कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे बीसीसीआयला आपली भूमिका बदलावी लागण्याची शक्यता आहे.

खेळाडूंच्या काळजीसाठी कोणती तयारी

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बीसीसीआय विशेष काळजी घेत आहे. खेळाडूंना कमीत कमी प्रवास करावा लागावा म्हणून देसभरात पक्त 6 मैदांनावर आयपीएलचे सामने खेळवले जातील. तसेच, खेळाडूंच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी बायो बबल तयार करण्यात आले आहेत. टीममधील एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झालीच तर त्यासाठी टीममध्ये अतिरिक्त खेळाडूंना ठेवण्यात आलं आहे. तसेच गर्दी होऊ नये म्हणून आयपीएलचे सर्व मॅचेस हे प्रेक्षकांविना खेळवले जातील.

आतापर्यंत 3 खेळाडूंना कोरोना

येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, यापूर्वीच विविध संघांच्या एकूण 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोलकाता नाइटरायडर्सचा खेळाडू नितीश राणा, दिल्ली कॅपिट्लसचा अक्षर पटेल आणि रॉयल चॅलेंजेर्स बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. याव्यतिरिक्त वानखेड़े स्टेडियमवरील ग्राउंड स्टाफ, चेन्नई सुपर किंग्जचा एक कर्मचारी आणि आयपीएल इव्हेंट मॅनेजमेंटशी निगडीत असलेल्या एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे.

खेळाडूंची रोज कोरोना चाचाणी होण्याची शक्यता

दरम्यान, सध्या 8 संघांपैकी एकूण 5 संघ मुंबईत आहेत. महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे या खेळाडूंना नेमकं कोठे ठेवायचं यावरसुद्धा विचार केला जाण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत असणाऱ्या खेळाडूंना कोरोना प्रतिंबधक नियम कठोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीय खेळाडूंची रोज कोरोना चाचणी करणे अनिर्वाय करु शकते. सध्या प्रत्येक तीन दिवसांनी खेळाडूंची कोरोना चाचणी केली जातेय.

इतर बातम्या :

IPl 2021 : विराट कोहलीचा RCB संघ यंदा प्लेऑफ गाठणार नाही; ‘या’ माजी खेळाडूची भविष्यवाणी

Covid-19 : IPL सामने मुंबईबाहेर नेण्याच्या हालचाली, BCCI मोठा निर्णय घेणार?

IPL 2021 : ज्या खेळाडूला कोळसा समजून विराटने संघातून काढलंं, आता तोच हिरा होऊन घेणार बदला

(BCCI may conduct Corona vaccination drive to all cricketers who will play in 14 edition of IPL)

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.