BCCI सचिव जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
एसीसीने (Asian Cricket Council) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबई : बीसीसीआयचे विद्यमान सचिव असलेले जय शाह (Bcci Secretary Jay Shah) यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी (Asian Cricket Council) नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आशियाई क्रिकेट काउन्सिलने ट्विट करत दिली आहे. शाह यांनी शनिवारी 30 जानेवारी 2021 ला पदभार स्वीकारला आहे. शाह यांची बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख असलेले नजमुल हुसन पापोन यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. जय शाह या पदावर नियुक्त झालेले सर्वात युवा अध्यक्ष आहेत. (BCCI Secretary Jai Shah has been appointed as the President of the Asian Cricket Council)
एसीसीकडून घोषणा
“बीसीसीआय सचिव जय शाह यांची एसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे. शहा या पदावर नियुक्त होणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. आम्ही त्यांच्या दमदार नेतृत्वात काम करण्याची वाट पाहत आहोत”, असं ट्विट एसीसीने (ACC) केलं आहे.
The ACC is delighted to announce that Mr. Jay Shah, Hon. Secretary, BCCI has been appointed as its new President. @JayShah @BCCI @ICC#ACC pic.twitter.com/uokxeSmgmu
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) January 30, 2021
जय शाह यांनी मानले आभार
एसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने शाह यांनी आभार मानले आहेत. मला या पदाबाबत पात्र समजलं हा माझा सन्मान समजतो. क्रिकेटच्या विकासासाठी मी आणखी प्रयत्नशील राहिन, अशी प्रतिक्रिया शाह यांनी दिली.
या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने शाह यांचे गुजरात क्रिकेट असोसिएशनने (Gujrat Cricket Asscosition) ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे. तर बीसीसाआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही त्यांचं कौतुक केलं आहे.
It’s curtain call, and the applause is for you @JayShah Sir. What you have been able to achieve is phenomenal. GCA and India couldn’t have been more impressed. @ACCMedia1 will be at new heights under your leadership. Best wishes for the new and successful tenure.@BCCI https://t.co/VrXN5KVVNJ
— Gujarat Cricket Association (Official) (@GCAMotera) January 30, 2021
एसीसी काय करतं?
आशिया क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाची जबाबजदारी एसीसीची (ACC) असते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 2020 मधील आशिया या वर्षातील जून महिन्यापर्यंत स्थगित करण्यात आली. दरम्यान यावेळेस आशिया स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा श्रीलंका किंवा बांगलादेशला मिळू शकतो.
जय शाह यांचा अल्पपरिचय
बीसीसीआयचे सचिव असलेले जय शाह हे गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आहेत. जय शाह यांनी 2019 पासून बीसीसीआयच्या सचिव पदाची यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडत आहेत.
संबंधित बातम्या :
BCCI | 87 वर्षांची परंपरा खंडित, रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द, बीसीसीआयचा मोठा निर्णय
(BCCI Secretary Jai Shah has been appointed as the President of the Asian Cricket Council)