टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शर्यतीत
भारतीय क्रिकेटसंघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. ‘क्रिकेट सल्लागार समिती (CAC)’ ने सध्याचे संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींसोबत इतर पाच उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट केली आहेत.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटसंघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. ‘क्रिकेट सल्लागार समिती (CAC)’ ने सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्रींसोबत इतर पाच उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करुन त्यांना प्रेझेंटेशनसाठी बोलावण्यात येईल. माजी कर्णधार कपिल देव हे सीएसीचे प्रमुख आहे. या समितीत कपिल देव यांच्या व्यतिरिक्त माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी आहेत.
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याव्यतिरिक्त प्रमुख प्रशिक्षकाच्या शर्यतीत टीम इंडियाचे माजी मॅनेजर लालचंद राजपूत (Lalchand Rajput), माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंह (Robin Singh), ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी (Tom Moody), न्यूजीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन (Mike Hesson), अफगानिस्तानचे माजी प्रशिक्षक फिल सिमन्स (Phil Simmons) हे आहेत.
प्रशिक्षक पदासाठी मुलाखती
टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी अंतिम सहा नावं शार्टलिस्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे आता पुढील प्रक्रियेला जास्त वेळ लागणार नाही. हे सर्व सहा उमेदवार सीएसीसमोर 16 ऑगस्टला प्रेझेंटेशन देतील. त्यानंतर यांच्या मुलाखती होतील.
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रवी शास्रींचा कार्यकाळ संपणार
भारतीय संघाच्या सध्याच्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. संघाच्या प्रशिक्षकपदाचा करार हा विश्वचषकापर्यंतचा होता. मात्र, प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ 45 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. आता वेस्ट इंडिज दौरा संपेपर्यंत रवी शास्री हे संघाचे प्रशिक्षक राहाणार आहेत. 3 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यादरम्यान, टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध तीन 20-20 आंतरराष्ट्रीय, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वेळापत्रक
3 ऑगस्ट : पहिला T20 सामना 4 ऑगस्ट : दुसरा T20 सामना 6 ऑगस्ट : तिसरा T20 सामना 8 ऑगस्ट : पहिला वन डे सामना 11 ऑगस्ट : दुसरा वन डे सामना 14 ऑगस्ट : तिसरा वन डे सामना 22 ते 26 ऑगस्ट : पहिली कसोटी 30 ऑगस्ट : दुसरी कसोटी
संबंधित बातम्या :
रॉबिन सिंहसह 2 हजार जणांचे अर्ज, टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण?
रवी शास्त्री नव्हे, भारताच्या प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आघाडीवर
प्रशिक्षक म्हणून पुन्हा रवी शास्त्रींना संधी मिळाली तर आनंदच : विराट कोहली
देवच आता भारतीय क्रिकेटचा तारणहार, द्रविडला BCCI च्या नोटिसीवरुन ‘दादा’ भडकला