AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या कसोटी विजयासाठी रोहित शर्मानं चार जणांची पाठ थोपाटली, म्हणाला, “खरंच कठीण होतं पण…”

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीची जादू दिसून आली. या विजयामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं गणित सोपं झालं आहे.

दुसऱ्या कसोटी विजयासाठी रोहित शर्मानं चार जणांची पाठ थोपाटली, म्हणाला, खरंच कठीण होतं पण...
रोहित शर्मानं विजयाचं श्रेय चार खेळाडूंना देत सांगितल की, "या मैदानात कठीण होतं..."Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 19, 2023 | 3:07 PM
Share

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारतानं दुसरा कसोटी सामना तिसऱ्या दिवशी आपल्या खिशात घातला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात विजयासाठी दिलेलं 115 धावांचं आव्हान भारतानं चार गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे आगेकूच केली आहे. आयसीसी गुणतालिकेत भारतानं आपलं दुसरं स्थान अबाधित ठेवलं आहे. दुसऱ्या कसोटी रविंद्र जडेजाला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 7 गडी बाद केले. कर्णधार रोहित शर्माने याने सामना विजयानंतर चार जणांचं कौतुक केलं. विराट कोहली, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन यांना विजयाचं श्रेय दिलं.

काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा

“जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता तेव्हा बऱ्याच गोष्टी घडत असतात. पण मला वाटले की विराट आणि जडेजा, अक्षर आणि अश्विन यांच्यातील भागीदारी महत्त्वाची होती. ही शतकी भागीदारी इतकी सोपी नव्हती. दुसरीकडे, आम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे, हे ही माहिती होतं.त्यांना शक्य तितक्या कमी धावांवर रोखायचं होतं.”, असं कर्णधार रोहित शर्मानं विजायानंतर सांगितलं.

विराट कोहली, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनची कामगिरी

आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी पहिल्या डावात प्रत्येकी तीन गडी बाद केले. रविंद्र जडेजाने 21 षटकात 57 धावा देत 3 गडी बाद केले. तर रविंद्र जडेजाने 21 षटकात 68 धावा देत 3 गडी टिपले. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 263 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पण विराट कोहली, रविंद्र जडेजा,अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांनी बाजू सावरली. विराट कोहलीने 44, जडेजाने 26, अक्षर पटेलनं 74 आणि अश्विननं 37 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडे अवघ्या एका धावेची आघाडी होती. मात्र रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनच्या फिरकीपुढे त्यांचं काही चाललं नाही. जडेजाने 7, तर अश्विननं 3 गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन .

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.