PSL | चेन्नईचा तडाखेबाज खेळाडू आयपीएलनंतर पाकिस्तानातील स्पर्धेत खेळणार
चेन्नईच्या या खेळाडूने आयपीएलच्या 13 व्या मोसमात एकूण 449 धावा केल्या.
इस्लामाबाद : चेन्नई सुपर किंग्जसचे (Chennai Super Kings) आयपीएलमधील (IPL 2020) आव्हान संपुष्टात आलं. यानंतर चेन्नईचे खेळाडू मायदेशी परतले आहेत. मात्र आयपीएल स्पर्धेनंतर चेन्नईचा स्टार फलंदाज पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) खेळताना दिसणार आहे. फॅफ डु प्लेसिस (Faf du Plessis) पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पण करणार आहे. फॅफ पेशावर जाल्मी (Peshawar Zalmi) या संघाकडून प्ले ऑफमधील सामने खेळणार आहे. फॅफला कायरन पोलार्डच्या जागेवर पेशावर जाल्मीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. आयपीएलनंतर पोलार्ड न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे फॅफला पोलार्डच्या जागी स्थान दिलं आहे. Chennai Super Kings star player Faf du Plessis will play in the Pakistan Super League
पीएसएल स्पर्धा साधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यादरम्यान खेळण्यात येते. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. दरम्यान आता 14 नोव्हेंबरपासून या स्पर्धेतील प्ले ऑफ सामन्यांना सुरुवात होणार आहे.
फॅफ काय म्हणाला?
“मी पीएसएलमधील प्ले ऑफ स्पर्धेत खेळण्यासाठी उत्साहित आहे. मी याआधी 2017 ला आयसीसी वर्ल्ड इलेव्हन टीमसोबत पाकिस्तानमध्ये खेळलो होतो. पीएसएलमध्ये खेळण्याचा अनुभव नक्कीच वेगळा असेल. कोरोनामुळे ही स्पर्धा कायमच स्मरणात राहिल,” असं फॅफ म्हणाला.
फॅफ व्यतिरिक्त पीएसएल स्पर्धेत एकूण 20 विदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच इंग्लंडचे 6 खेळाडूही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. पीएसएल स्पर्धेतील पहिली क्वालिफायर आणि एलिमिनेटर मॅच 14 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. दुसरी क्वालिफायर मॅच 15 नोव्हेंबरला पार पडणार आहेत. तर अंतिम सामना 17 नोव्हेंबरला होणार आहे.
फॅफची आयपीएल कारकिर्द
चेन्नईची आयपीएलच्या 13 व्या मोसमातील कामगिरी निराशाजनक राहिली. मात्र फॅफने चांगली कामगिरी केली. फॅफने या मोसमातील एकूण 13 सामन्यात 140.75 च्या स्ट्राईक रेटने 40.81 च्या सरासरीने 4 अर्धशतकांच्या मदतीने 449 धावा ठोकल्या. नाबाद 87 ही त्याची या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
दरम्यान आयपीएलच्या 13 व्या मोसमातील प्ले ऑफसाठीचे 3 संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) समावेश आहे.
संबंधित बातम्या :
India Tour Australia | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही? सौरभ गांगुली म्हणतो…
KXIP vs CSK : वॉटसन आणि डू प्लेसिसने रचली IPL इतिहासातील सर्वात मोठी पार्टनरशीप
Chennai Super Kings star player Faf du Plessis will play in the Pakistan Super League