Chris Gayle IPL 2021 PK Team Player : क्रिस गेलची बॅट तळपणार, आयपीएलच्या 14 व्या मोसमात पंजाबला ‘किंग’ करणार?

क्रिस गेल (Chris Gayle), वेस्टइंडिजचा डावखुरा बॅट्समन.. त्याने हातात बॅट घेतल्यावर ती तलवारीसारखे भासते आणि मैदानात बॅटिंगसाठी उतरल्यावर तो युद्धासाठी निघतोय, असा भास होतो. | Chris Gayle IPL 2021

Chris Gayle IPL 2021 PK Team Player : क्रिस गेलची बॅट तळपणार, आयपीएलच्या 14 व्या मोसमात पंजाबला 'किंग' करणार?
Chris Gayle
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 10:44 AM

मुंबई : क्रिस गेल (Chris Gayle), वेस्टइंडिजचा डावखुरा बॅट्समन.. त्याने हातात बॅट घेतल्यावर ती तलवारीसारखे भासते आणि मैदानात बॅटिंगसाठी उतरल्यावर तो युद्धासाठी निघतोय, असा भास होतो. मैदानावर गेल्यावरही एखाद्या योद्ध्यासारखा तो प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडतो. मग तो पॉवरप्ले पाहत नाही, मिडल ओव्हर पाहत नाही की डेथ ओव्हर… तो एकदा सेट झाला की धावांचा डोंगर उभा केल्याशिवाय तो मैदानातून परतत नाही. त्याच्या अनेक अफलातून खेळींनी त्याने वेस्ट इंडिजला एकहाती सामने जिंकवून दिलेत. त्याच्यावर वेस्टइंडिज संघाचा एवढा विश्वास आहे की त्याच्या एकट्याची जरी बॅट बोलली तरी तो तीन फलंदाजांचं काम एकटा करतो, एवढा गाढा विश्वास त्याच्यावर संघाचा आहे. त्याने हा संघाचा विश्वास अनेक वेळा सार्थ ठरवलाय. (Chris Gayle IPL 2021 PK Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos west indies Cricket Players Latest News in Marathi)

क्रीजमधून थोडंसही न हलता जागेवरुन षटकार खेचण्यात त्याचा हात सध्याच्या घडीला कुणीही धरु शकणार नाही. तडकाफडकी बॅटिंग करणं गेलच्या रक्तात आहे. त्यामुळे तो संथ पद्धतीने खेळू शकत नाही. त्याचा अनेक वेळा त्याला फायदाही झालाय आणि तोटाही… पण एकदा का त्याची बॅट बोलली की तो सारं काही विसरायला लावतो… फॉरमॅट कुठलाही असो गेलचा फॉरमॅट ठरलेला… कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करणं.. त्यामध्येही अधिकाधिक चौकार षटकारांची आतिषबाजी करणं, हे गेललं आवडतं… आयपीएलमध्ये गेल पंजाब किंग्स (Punjab kings) संघाकडून खेळतो. याअगोदर तो कोलकाता, आणि बंगळुरु संघाकडून खेळलाय. तिन्ही संघाकडून खेळताना त्याने अनेक यादगार खेळी खेळल्या आहेत. एक नजर टाकूया गेलच्या क्रिकेट कारकीर्दीवर

क्रिस गेलचं टेस्ट, वनडे आणि टी ट्वेन्टीत पदार्पण कधी?

कसोटी पदार्पण- क्रिस गेलने झिम्बाब्वेविरुद्ध मार्च 2000 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. वनडे पदार्पण- क्रिस गेलने भारताविरुद्ध सप्टेंबर 1999 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. टी ट्वेन्टी पदार्पण- क्रिस गेलने न्यूझीलंडविरुद्ध फेब्रुवारी 2006 मध्ये टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.

Format     Match     Inning     Runs      HS      Strike rate Tests       103              182          7214      333        60.26 ODIs        301            294           10480   215          87.19 T20Is         61               57            1656     117          140.81 IPL          132             132            4772      175*         150.11

क्रिस गेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी

क्रिस गेलने आतापर्यंत 103 कसोटी मॅचेसमध्ये 60.26 च्या स्ट्राईक रेटने 7 हजार 214 रन्स केले आहेत. त्यातील 333 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने 301 मॅचेसमध्ये 87.19 च्या स्ट्राईक रेटने 10 हजार 480 रन्स केले आहेत. त्यातील 215 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरलीय. दुसरीकडे टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 61 मॅच खेळल्या आहेत. त्यात 140 च्या स्ट्राईट रेटने त्याने 1 हजार 656 धावा फटकावल्या आहेत. त्यात 117 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 132 सामन्यांत 150.11 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 772 रन्स केले आहेत. त्यात 175* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

आयपीएलचा थरार 9 एप्रिलपासून…

आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

(Chris Gayle IPL 2021 PK Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos west indies Cricket Players Latest News in Marathi)

हे ही वाचा :

KL Rahul IPL 2021 PK Team Player : रन्सचा पाऊस पाडायला के.एल. राहुल उत्सुक, पंजाब संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा!

David warner IPL 2021 Sunrisers Hydrabad Team Player : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी डेव्हिड वॉर्नर सज्ज, हैदराबादला विजेतेपद मिळवून देण्यासाठी उत्सुक

Bhuvneshwar Kumar IPL 2021 Sunrisers Hydrabad Team Player : आयपीएलच्या 14 व्या मोसमात धमाका करण्यासाठी भुवनेश्वर सज्ज, हैदराबादसाठी हुकमाचा एक्का!

Ben Stokes IPL 2021 Rajsthan Royals Team Player : अष्टपैलू बेन स्टोक्स राजस्थानसाठी हुकमी एक्का, 14 व्या मोसमातल्या कामगिरीकडे लक्ष

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.