CWG 2022 Weightlifting, Sanket Sargar : सांगलीतील संकेत सरगरला राज्य सरकारकडून 30 लाख, त्यांच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Sanket Sargar : सांगलीतील संकेत सरगरनं राष्ट्रकुलमध्ये वेटलिफ्टींगमध्ये रौप्यपदक पटकावलंय. त्याच्य या कामगिरीबद्दल सरकार संकेतला 30 लाख तर त्यांच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख देणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलीय.
औरंगाबाद : बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगरनं (Sanket Sargar) रौप्यपदक पटकावत भारताचं पदकांचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींगमध्ये (CWG 2022 Weightlifting) 55 किलोग्रॅम वजनी प्रकारात त्यानं ही कामगिरी केली. याची दखल घेत सांगलीतील संकेत सरगर या खेळाडूनं रौप्यपदक पटकावल्याचं अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलंय . तर याचवेळी त्यांनी संकेतला राज्य सरकारकडून 30 लाख देणार असल्याचं सांगत त्यांच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सांगलीच्या संकेतनं केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्याच्या कामगिरीची जगभरात चर्चा आहे. त्यानं त्यासाठी घेतलेले कष्ट आणि खेळासाठी केलेल प्रयत्न देखील मोठे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेतच्या कामगिरीची दखल घेत त्याला तीस लाखांची रक्कम राज्य सरकारकडून देणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर याचवेळी त्याच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख रुपये देणार असल्याचं देखील मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये म्हणालेत.
संकेत सरगरविषयी….
- संकेत सरगर हा मुळचा सांगलीचा आहे
- संकेतचे वडिलांच्या पान आणि चहाचा गाडा चालवून आपल्या परिवाराचा उदरर्निवाह करतात
- संकेतही त्याच्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करतो
- संकेत त्याच्या वडिलांच्या चहाच्या गाड्यावर मुंगाचे वडे आणि वडा पाव बनवतो
- पानटपरीदेखील संकेत चालवतो
- संकेतच्या वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात यशस्वी खेळाडू बनवले आहे.
- सर्गर यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे
- त्यापैकी काजल आणि संकेत हे दोघेही वेटलिफ्टर आहेत
- दुसरा मुलगा जीवन हा सध्या शिक्षण घेत आहे. दोघांनी आयुष्यात पुढे जावे अशी त्यांची इच्छा आहे
संकेतच्या यशानं त्याच्या घरच्यांना आनंद झाला आहे. संकेतने जिंकलेल्या पदकानंतर माझी ओळख बदलली असल्याचे त्याचे वडील अभिमानाने सांगतात. तर सांगलीसह अवघ्या महाराष्ट्रात संकेतचं कौतुक केलंय जातंय.
256 किलोग्रॅम वजन उचलण्याचा विक्रम
21 वर्षीय संकेतच्या नावावर सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये स्पर्धेत 256 किलोग्रॅम वजन उचलण्याचा विक्रम आहे. तसेच राष्ट्रीय स्थरावरही त्यांने अनेकदा पदकं मिळवली आहेत. संकेत हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा इतिहासाचा विद्यार्थी आहे.
खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. गेल्या वेळी राष्ट्रकुल स्पर्धेत सतीश शिवलिंगम आणि रंगला वेंकट राहुल यांनी सुवर्ण जिंकले होते. संकेतला मात्र, ही कामगिरी करता आली नाही.