CWG 2022 Live Updates: Squash: जोश्ना चिनाप्पाचा क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश

| Updated on: Aug 01, 2022 | 6:47 AM

कॉमनवेल्थ गेम्स लाइव: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दुसऱ्यादिवशी भारताने पदकांच खात उघडलं. आज पदकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.

CWG 2022 Live Updates: Squash: जोश्ना चिनाप्पाचा क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश

कॉमनवेल्थ गेम्स (CWG) लेटेस्ट न्यूज: बर्मिंघम मध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दुसऱ्यादिवशी भारताने पदकांच खात उघडलं. संकेत महादेव सर्गरने देशाला पहिलं पदक मिळवून दिलं. मीराबाई चानू सुद्धा सुवर्णपदक आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरली. आज होणाऱ्या स्पर्धांमध्ये सगळ्या नजर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर असतील. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी आपले सलामीचे सामने गमावले आहेत. आज दोन्ही टीम्स जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. त्याशिवाय आज सगळ्यांच्या नजरा विश्व चॅम्पियन बॉक्सर निकहत जरीनच्या सामन्यावर असेल. बॅडमिंटन मध्ये भारतीय मिक्सड टीम क्वार्टर फायनलचा सामना खेळणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Jul 2022 07:59 PM (IST)

    Squash: जोश्ना चिनाप्पाचा क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश

    जोश्ना चिनाप्पाने न्यूझीलंडच्या कॅटलिन वाट्सला 4-0 ने हरवलं. तिने 11-8, 9-11, 11-4, 11-6 असा विजय मिळवला. जोश्नाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

  • 31 Jul 2022 07:42 PM (IST)

    Weightlifting: पॉपीने स्नॅच मध्ये उचललं 81 किलो वजन

    पॉपीने स्नॅच इवेंट मध्ये पहिल्या प्रयत्नात 81 किलो वजन उचललं. त्यानंतर 84 किलो वजन उचलण्यात अपयश आलं. तिसऱ्या प्रयत्नात 86 किलो वजन उचलण्यातही अपयश आलं. सध्या ती सहाव्या स्थानावर आहे.

  • 31 Jul 2022 07:06 PM (IST)

    Lawn Bowl: पुरुष पेयर्सच्या क्वार्टर फायनल मध्ये भारत

    भारताने पुरुष पेयर्सच्या सेक्शन सामन्यात इंग्लंडवर 18-15 असा विजय मिळवला. त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

  • 31 Jul 2022 07:03 PM (IST)

    भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय

    कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ आमने-सामने आले होते. यंदा कॉमनवेल्थ मध्ये महिला टी 20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारताने या मॅच मध्ये पाकिस्तानवर 8 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 100 धावांचे लक्ष्य दोन विकेट गमावून 11.4 षटकात पार केलं.

  • 31 Jul 2022 06:36 PM (IST)

    स्विमिंग, टेबल टेनिस अपडेट

    – भारतीय जलतरणपटू श्रीहरी नटराजने पुरुषांच्या 50 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश केला.

    – भारतीय पुरुष टेबल टेनिस टीमने बांगलादेशवर 3-0 ने विजय मिळवून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला.

  • 31 Jul 2022 05:43 PM (IST)

    Boxing: भारताला झटका, शिव थापाचा पराभव

    शिव थापाचा राऊंड ऑफ 16 मध्ये पराभव झाला आहे. पहिल्या दोन राऊंड मध्ये शिव थापाने आघाडी घेतली होती. पण त्यानंतर स्कॉटिश खेळाडूने चांगलं पुनरागमन केलं. त्याने सामना जिंकला. थापा हा सामना 1-4 ने हरला.

  • 31 Jul 2022 05:25 PM (IST)

    बॉक्सिंग मध्ये निकहतची विजयी सुरुवात

    भारताची स्टार महिला बॉक्सर निकहत जरीनने 50 किलो गटात हेलेनाला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. निकहतने हा सामना 5-0 असा एकतर्फी जिंकला. निकहतने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. प्रतिस्पर्ध्याला बिलकुल संधी दिली नाही.

  • 31 Jul 2022 05:01 PM (IST)

    बॉक्सिंग मध्ये निकहत वर नजरा

    महिला बॉक्सिंग मध्ये भारताची निकहत जरीन 50 किलो वजनी गटात उतरणार आहे. हेलेना इस्माइल विरुद्ध तिचा सामना आहे. निकहतने विश्व चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं.

  • 31 Jul 2022 04:03 PM (IST)

    वेटलिफ्टिंग मध्ये भारताला आणखी एक गोल्ड

    पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात जेरेमी लालरिनुंगाने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. याआधी काल मीरबाई चानूने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. जेरेमीने एकूण 300 किलो वजन उचललं. त्याने रेकॉर्ड केला. स्नॅच मध्ये त्याने 140 किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये 160 किलो वजन उचललं.

  • 31 Jul 2022 03:36 PM (IST)

    जलतरण: साजन प्रकाश चौथ्या स्थानावर

    साजन प्रकाश 200 मीटर बटरफ्लाय हीट-3 मध्ये चौथ्या स्थानावर राहिला. तो सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे की, नाही, याबद्दल स्थिती अजून स्पष्ट नाहीय. हीट्स पूर्ण झाल्यानंतरच त्या बद्दल समजेल.

  • 31 Jul 2022 03:34 PM (IST)

    IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय

    भारत आणि पाकिस्तान मध्ये आज सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी वातावरण खराब आहे. टॉस आधी पाऊस सुरु झालाय.

  • 31 Jul 2022 03:32 PM (IST)

    जेरेमी लालरिनुंगा स्नॅच मध्ये टॉपवर

    जेरेमी लालरिनुंगा स्नॅच मध्ये 67 किलो वजनी गटात पहिल्या स्थानावर आहे. त्याने सर्वाधिक 140 किलो वजन उचललं असून कॉमनवेल्थ गेम्स मधला तो एक रेकॉर्ड आहे.

  • 31 Jul 2022 02:52 PM (IST)

    लॉन बॉल: तान्याचा एकतर्फी खेळ

    तान्याने एकतर्फी खेळ दाखवला आहे. तिने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमनाची कोणतीच संधी दिली नाही. आधी पिछाडीवर राहिल्यानंतर तिने आघाडी घेतली. 21-12 अशा गुण फरकाने तिने गेम जिंकला.

  • 31 Jul 2022 02:50 PM (IST)

    जिम्नॅस्टिक: योगेश्वर सिंह पाचव्या स्थानावर

    योगेश्वरने वॉल्ट मध्ये 13.00 गुण मिळवले. त्याचे एकूण 25.550 गुण झाले आहेत. तो सध्या पाचव्या स्थानावर आहे.

  • 31 Jul 2022 02:49 PM (IST)

    वेटलिफ्टिंग: जेरेमीचा इवेंट सुरु

    वेटलिफ्टिंग मध्ये पुरुषांचे 67 किलो वजनी गटातले सामने सुरु झाले आहेत. या कॅटेगरीत जेरेमीवर भारताची नजर असेल. तो पदकासाठी प्रबळ दावेदार आहे.

  • 31 Jul 2022 02:11 PM (IST)

    जिम्नॅस्टिक: योगेश्वर सिंहने रिंग एक्सरसाइज केली पूर्ण

    योगेश्वर सिंहने रिंग एक्सरसाइज पूर्ण केली आहे. त्याने एकूम 12.359 पॉइंट मिळवले. डिफिकल्टी मध्ये त्याने 4.200 गुण, तर एक्सीक्यूशन मध्ये 8.150 गुण मिळवले.

  • 31 Jul 2022 02:08 PM (IST)

    लॉन बॉल: तान्याकडे आघाडी

    तान्या सुरुवातीला पिछाडीवर होती. पण तिने शानदार पुनरागमन केलं आहे. तिने 9-3 अशी आघाडी मिळवली आहे.

  • 31 Jul 2022 01:00 PM (IST)

    फुलंब्री तालुक्यातील पाल पाट्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होणार भव्य स्वागत

    फुलंब्री तालुक्यातील पाल पाट्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होणार भव्य स्वागत

    स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित , क्रेनद्वारे हार घालून करणार स्वागत

  • 31 Jul 2022 11:59 AM (IST)

    आज होणारे सामने

    जलतरण: पुरुषांची 200 मीटर बटरफ्लाय – हीट 3: साजन प्रकाश (3.07 वाजता)

    पुरुषांची 50 मीटर बॅकस्ट्रोक – हीट 6: श्रीहरि नटराज (3.31 वाजता )

    जिमनॅस्टिक:

    पुरुषांची ऑल-अराउंड फ़ायनल: योगेश्वर सिंह (दुपारी 1.30 वाजता)

    बॅडमिंटन:

    मिश्रित टीम क्वार्टर फ़ायनल: रात्री 10 वाजता

    महिला टी20 क्रिकेट:

    भारत विरुद्ध पाकिस्तान (दुपारी 3.30 वाजता)

    बॉक्सिंग:

    48-50 किलो (लाइट फ्लायवेट) राउंड 16: निकहत जरीन (संध्याकाळी 4.45 वाजता)

    60-63.5 किग्रा (लाइट वेल्टरवेट) राउंड 16: शिव थापा (संध्याकाळी 5.15 वाजता)

    71-75 किग्रा (मिडिलवेट) राउंड 16: सुमित (सोमवारी सकाळी 12.15 वाजता)

    92 किग्रा से अधिक (सुपर हेवीवेट): सागर (सोमवारी दुपारी 1 वाजता)

    हॉकी (पुरुष):

    भारत विरुद्ध घाना: रात्री 8.30 वाजता

    सायकिलिंग:

    पुरुषांची स्प्रिंट क्वालीफाइंग: एसो एल्बेन, रोनाल्डो लाइटोनजाम, डेविड बेकहम (दुपारी 2.32 वाजल्यापासून)

    पुरुषांची 15 किमी स्क्रॅच रेस क्वालीफाइंग: वेंकप्पा केंगालागुट्टी, दिनेश कुमार (संध्याकाळी 4.20 वाजल्यापासून)

    महिला 500 मीटर टाइम ट्रेल फायनल: त्रियाशा पॉल, मयूरी लाटे (रात्री 9.02 वाजता)

    वेटलिफ्टिंग:

    पुरुष 67 किग्रा फायनल: जेरेमी लालरिनुंगा (दुपारी 2 वाजता)

    महिला 59 किग्रा फायनल: पोपी हजारिका (संध्याकाळी 6.30 वाजता)

    पुरुषांची 73 किग्रा फायनल: अचिंता शेयुली (रात्री 11 वाजता)

    स्क्वॉश:

    महिला एकेरी राउंड 16: जोशना चिनप्पा (संध्याकाळी 6 वाजल्यापासून)

    पुरुष एकेरी राउंड 16: सौरव घोषाल (संध्याकाळी 6.45 वाजल्यापासून)

    टेबल टेनिस:

    पुरुष टीम क्वार्टरफायनल: दुपारी 2 पासून

    लॉन बॉल:

    महिला एकेरी: तानिया चौधरी (रात्री 10.30 वाजता)

    पुरुष पेयर्स: भारत विरुद्ध इंग्लंड (संध्याकाळी 4 वाजता)

  • 31 Jul 2022 11:59 AM (IST)

    Patra Chawl Scam : यशोमती ठाकूर म्हणतात…

    देशात दडपशाही आहे हिटलरशाही आहे

    उद्धव ठाकरे यांच्या वर दबाब आणण्याच काम केलं जातं आहे

    विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे

    एकनाथ शिंदे सोबत गेले ते वाशिंग पावडरमध्ये स्वच्छ केले का?

    यशोमती ठाकूर यांचा सवाल

  • 31 Jul 2022 11:51 AM (IST)

    रोमांचक दिवस

    राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे. आज महत्त्वाचे सामने होणार आहेत भारतीय महिला क्रिकेट संघ पाकिस्तान विरोधात मैदानात उतरेल. निकहत जरीन आणि शिव थापा बॉक्सिंग मध्ये आपल्या पंचची ताकत दाखवतील. बॅडमिंटन मध्ये मिक्सड टीम इवेंट मध्ये भारत क्वार्टर फायनलचा सामना खेळणार आहे. पुरुष हॉकी संघही आज आपल्या अभियानाची सुरुवात करेल.

Published On - Jul 31,2022 11:49 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.