CWG 2022, PV Sindhu : पीव्ही सिंधूचं राष्ट्रकुलमध्ये पदक निश्चित, उपांत्य फेरीत सिंगापूरच्या जिया मिनचा पराभव
भारतीय स्टार असलेल्या सिंधूला पहिल्या गेममध्ये सिंगापूरच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला. पीव्ही सिंधूनं तिच्या अनुभवाचा चांगला उपयोग केला आणि पहिला गेम 21-19 असा जिंकला. अधिक जाणून घ्या...
नवी दिल्ली : पीव्ही सिंधूनं 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) पदक (Medal) निश्चित केले आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं (PV Sindhu) उपांत्य फेरीत सिंगापूरच्या जिया मिनचा पराभव केला. भारतीय स्टार असलेल्या सिंधूला पहिल्या गेममध्ये सिंगापूरच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला असला तरी सिंधूनं तिच्या अनुभवाचा चांगला उपयोग केला आणि पहिला गेम 21-19 असा जिंकला. सिंधूला उपांत्य फेरीतही धडक मारावी लागली. तिनं उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या गोह वेई जिनचा पराभव केला. गोह ही 60व्या क्रमांकाची खेळाडू आहे. पण, तिनं सिंधूला घाम फोडला. सिंधूनं 19-21, 21-14, 21-18 असा विजय मिळवला.
हायलाईट्स
- राष्ट्रकुलमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची कमाई, पुन्हा पदक निश्चित
- सिंधूला पहिल्या गेममध्ये सिंगापूरच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला
- सिंधूनं तिच्या अनुभवाचा चांगला उपयोग केला
- पहिला गेम 21-19 असा जिंकला
- सिंधूला उपांत्य फेरीतही धडक मारावी लागली
- उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या गोह वेई जिनचा पराभव केला
- गोह ही 60व्या क्रमांकाची खेळाडू आहे
- तिनं सिंधूला घाम फोडला. सिंधूनं 19-21, 21-14, 21-18 असा विजय मिळवला.
- गोहने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत भारतीय खेळाडूला थक्क केले
- सिंधूने मात्र त्यानंतर बरोबरी साधत विजयाची नोंद केली
गोहवर सलग तिसरा विजय
ही सिंधू आहे जिने या गेम्सच्या मागील दोन मोसमात कांस्य आणि रौप्य पदके जिंकली आहेत. गोरसेवर तिचा सलग तिसरा विजय आहे. तिला कॉमनवेल्थ गेम्समधील मिश्र सांघिक स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत गोहने कडवी झुंज दिली. जी या सामन्यातही कायम राहिली. गोहने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत भारतीय खेळाडूला थक्क केले. सिंधूने मात्र त्यानंतर बरोबरी साधत विजयाची नोंद केली. दरम्यान, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं उपांत्य फेरीत सिंगापूरच्या जिया मिनचा पराभव केला
कडव्या आव्हानाचा सामना
भारतीय स्टार असलेल्या सिंधूला पहिल्या गेममध्ये सिंगापूरच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला असला तरी सिंधूनं तिच्या अनुभवाचा चांगला उपयोग केला आणि पहिला गेम 21-19 असा जिंकला. सिंधूला उपांत्य फेरीतही धडक मारावी लागली. तिनं उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या गोह वेई जिनचा पराभव केला. गोह ही 60व्या क्रमांकाची खेळाडू आहे. पण, तिनं सिंधूला घाम फोडला. सिंधूनं 19-21, 21-14, 21-18 असा विजय मिळवला. दरम्यान, आता खेळाडूंकडून पदकांच्या आशा देखील वाढल्या आहेत.