CWG 2022 Squash: दिनेश कार्तिकच्या बायकोकडून पदकाची अपेक्षा, 9 खेळाडू स्क्वॉश मध्ये भारताच्या मेडलचा रंग बदलणार?

CWG 2022 Squash: बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) स्पर्धेत भारताला स्क्वॉश या खेळातून पदकाची अपेक्षा आहे. दीपिका पल्लीकल, (deepika pallikal) जोशना चिनप्पा, सौरव घोषाल यांनी पदकविजेती कामगिरी करण्यासाठी आपली कंबर कसली आहे.

CWG 2022 Squash: दिनेश कार्तिकच्या बायकोकडून पदकाची अपेक्षा, 9 खेळाडू स्क्वॉश मध्ये भारताच्या मेडलचा रंग बदलणार?
cwg 2022 squash team Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 2:46 PM

मुंबई: बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) स्पर्धेत भारताला स्क्वॉश या खेळातून पदकाची अपेक्षा आहे. दीपिका पल्लीकल, (deepika pallikal) जोशना चिनप्पा, सौरव घोषाल यांनी पदकविजेती कामगिरी करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. मागच्या 2 कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारतीय स्कवॉशपटूनी शानदार प्रदर्शन केलं आहे. भारताने या मध्ये अजूनपर्यंत 3 मेडल्स (Medals) मिळवले आहेत. 2014 ग्लास्गो कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने पहिल्यांदा स्क्वॉश मध्ये पदक विजेती कामगिरी केली होती. दीपिका पल्लीकल आणि जोशना चिनप्पाने महिला दुहेरीत पदक जिंकून भारताचं खात उघडलं होतं. पुढच्या 2018 गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स मध्येही भारताने 2 रौप्यपदक जिंकली होती.

14 वर्षाच्या अनहतकडून पदकाची अपेक्षा

दीपिका आणि सौरव घोषालने मिश्र दुहेरीत रौप्य आणि दीपिका-चिनप्पाने महिला दुहेरीत रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. यावेळी सुवर्णपदकावर नजर असेल. यावेळी पुरुष गटात 5 आणि महिला गटात 4 खेळाडू उतरतील. दीपिका, जोशना, सौरव, रमित टंडन यांच्याशिवाय अनहत सिंहवर सुद्धा सगळ्यांच लक्ष असेल. अवघ्या 14 वर्षाची अनहत कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. ती भारताची सर्वात युवा खेळाडू आहे.

पदकाचे दावेदार

सौरव घोषाल – सौरव घोषाल विद्यमान रँकिंग मध्ये 15 व्या स्थानावर आहे. यावर्षी त्याने दीपिक सोबत मिळून वर्ल्ड डबल्स चॅम्पिनशिप मध्ये मिश्र दुहेरीत किताब जिंकला होता. घोषाल सर्वाधिक चांगलं रँकिंग असलेला भारतीय खेळाडू आहे.

दीपिका पल्लीकल – यावर्षाच्या सुरुवातीला दीपिकाने ग्लास्गो वर्ल्ड डबल्स चॅम्पियनशिप मध्ये मिश्र आणि महिला दुहेरी 2 गोल्ड जिंकून इतिहास रचला होता. दीपिका डबल्स स्पेशलिस्ट आहे.

जोशना चिनप्पा – 18 वेळा नॅशनल चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असलेल्या जोशनाला 2014 कॉमनवेल्थ गेम्स मधील कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे. जोशनाने दीपिकाच्या साथीने भारताला 2014 मध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

रमित टंडन – रमित टंडनने या महिन्यात आपल्या करीयरमधील सर्वश्रेष्ठ 36 वी रँकिंग मिळवली. एशियन गेम्स मधील तो मेडलिस्ट आहे. तो बऱ्ंयाच काळापासून भारतीय संघाचा भाग आहे. ज्यूनियर स्तरावर त्याने 6 राष्ट्रीय किताब जिंकले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.