CWG 2022, CWG 2022 Table Tennis : अचंता आणि श्रीजाच्या जोडीनं इतिहास रचला, टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
CWG 2022 Table Tennis : दिग्गज टेबल टेनिसपटू शरथ आता आज खेळांच्या शेवटच्या दिवशी पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. 2006 मध्ये त्याच्या पहिल्याच गेममध्ये शरथने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले.
नवी दिल्ली : भारताचा दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने (Anchat Sharath Kamal) देशाच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केले आहे. अनुभवी स्टार शरथने युवा खेळाडू श्रीजा अकुलासह (Sreeja Akula) मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत (CWG 2022 Table Tennis) सुवर्णपदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या (CWG 2022) नवव्या दिवशी 40 वर्षीय शरथ आणि 24 वर्षीय श्रीजा या खास भारतीय जोडीनं रविवारी 7 ऑगस्टला उशिरा खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत मलेशियाचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. श्रीजाचे हे पहिले राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक आहे, तर शरथचे हे 12वे पदक आहे. रविवारी या फायनलपूर्वी शरथ आणि श्रीजानं वेगवेगळे सामने खेळले होते. श्रीजानं कांस्यपदकाचा सामना खेळला, जिथे तिला ऑस्ट्रेलियाकडून 7 गेमपर्यंत चाललेल्या खडतर सामन्यात 3-4 असा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे शरथ कमल याआधी पुरुष दुहेरीत साथियानकडून अंतिम फेरीत पराभूत झाला होता आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्यानंतर त्याने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी जिंकून सुवर्णपदकावर दावा केला.
इतिहास रचला
GOLD FOR SHARATH AND SREEJA ?
??’s dynamic #TableTennis Mixed Doubles ?pair – the young sensation #SreejaAkula & the evergreen @sharathkamal1 team up to clinch the GOLD ? at #CommonwealthGames2022
?? wins 3-1 against ?? in the XD final
A pairing to remember! ?#Cheer4India pic.twitter.com/oFRtlnOOjQ
— SAI Media (@Media_SAI) August 7, 2022
भारताचे दुसरे सुवर्ण
पाचव्या CWG मध्ये प्रथमच खेळांचा भाग बनलेल्या अचंता आणि श्रीजा यांनी मलेशियाच्या जावेन चुंग आणि कॅरेन लेन यांचा 11-4, 9-11, 11-5, 11-6 असा पराभव केला आणि या खेळांमध्ये टीटीचा दुसरा .देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. यापूर्वी शरथने जी साथियान, हरमीत देसाई आणि सनील शेट्टी यांच्यासह पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
2006 च्या मेलबर्न गेम्समध्ये पदार्पण करणाऱ्या शरथने त्याचे सहावे CWG सुवर्णपदक आणि एकूण 12वे सुवर्णपदक जिंकले. आता त्याला आणखी एक सुवर्ण संधी आहे.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरी
भारताचा सर्वात यशस्वी पुरुष टीटी खेळाडू शरथ आता सोमवारी 8 ऑगस्ट रोजी खेळांच्या शेवटच्या दिवशी पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. 2006 मध्ये त्याच्या पहिल्याच गेममध्ये शरथने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर, तो प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि आता या वेळी ही स्पर्धा त्याची सुवर्ण हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या जवळ आहे. CWG मध्ये अचंताच्या नावावर 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्यपदक आहे.