CWG 2022: IND vs PAK, पाकिस्तानने जिंकला टॉस
CWG 2022: भारत आणि पाकिस्तानचे संघ कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये आज आमने-सामने आहेत. दोन्ही संघांनी आपला सलामीचा सामना गमावला आहे.
मुंबई: भारत आणि पाकिस्तानचे संघ कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये आज आमने-सामने आहेत. दोन्ही संघांनी आपला सलामीचा सामना गमावला आहे. भारताला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून आणि पाकिस्तानला बार्बाडोसकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघांसाठी आज विजय आवश्यक आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी हवामान बिघडलं होतं. सामना आता उशिराने सुरु होईल. मैदान ओलरस आहे. पण चांगली बाब म्हणजे हलकं ऊन पडलय. साडेतीन वाजता टॉस उडवला जाणार होता. पण पुन्हा एकदा पाऊस सुरु झाला. पीच पुन्हा एकदा कव्हर्सने झाकण्यात आले होते.
पाकिस्तानने जिंकला टॉस
दरम्यान पाऊस आता थांबला असून पाकिस्तानची कॅप्टन बिस्माह मारुफने टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे वेळ वाया गेल्याने सामना आता 18-18 षटकांचा खेळवण्यात येईल.