CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये पीव्ही सिंधुच्या हातात झळकणार तिरंगा, उद्घाटन समारंभात भारतीयांचं नेतृत्व करणार
गोल्ड कोस्टमध्ये 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सिंधू ध्वजवाहक होती. तिला हा मान दुसऱ्यांना मिळाल्याने तिचाही उत्साह वाढला आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू पूर्ण जोमाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मुंबई : येत्या काही दिवसात कॉमनवेल्थ गेम्सचा (Commonwealth Games) थरार रंगणारआहे. यात भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिला बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी भारताकडून ध्वजवाहक बनवण्यात म्हणून जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात (Opening Ceremony) भारतातून एकूण 164 खेळाडू सहभागी होणार आहेत. विश्वविजेती सिंधू बर्मिंगहॅम येथे महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. गोल्ड कोस्ट आणि ग्लासगो येथे गेल्या दोन टप्प्यात तिने रौप्य आणि कांस्यपदके जिंकली होती. गोल्ड कोस्टमध्ये 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सिंधू ध्वजवाहक होती. तिला हा मान दुसऱ्यांना मिळाल्याने तिचाही उत्साह वाढला आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू पूर्ण जोमाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
नीरज चोप्राची संधी हुकली
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्घाटन समारंभासाठी सिंधूला भारतीय संघाचा ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. यापूर्वी ही जबाबदारी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्याकडे देण्यात येणार होती. मात्र त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुखापत झाली, त्यानंतर तो राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला होता. चोप्राने आपल्या सोशल मीडिया हँडलवर म्हटले आहे की बर्मिंगहॅममध्ये मी देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही याची मला खंत आहे. विशेषत: उद्घाटन समारंभात भारतीय संघाचा ध्वजवाहक होण्याची संधी न मिळाल्याने मी निराश झालो आहे.
नीरज चोप्राने मानले देशाचे आभार
पुढे नीरज चोप्रा म्हणाला की गेल्या काही दिवसांत मला सर्व देशवासीयांकडून मिळालेल्या प्रेम आणि आदराबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण अशाच प्रकारे माझ्यासोबत सहभागी होऊन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या देशातील सर्व खेळाडूंना पाठिंबा देत राहाल. जय हिंद.
सिंधुची कामगिरी कशी राहणार?
सिंधूने यावर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपन या दोन सुपर 300 विजेतेपद पटकावले आहेत. तिला अव्वल खेळाडूंविरुद्ध चांगली कामगिरी करता येत नाही ही तिच्यासाठी चिंतेची बाब आहे. तिला अलीकडेच थायलंडच्या रत्चानोक इंथानॉन, चीनच्या चेन यू फेई आणि कोरियाच्या अन से विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. जर सातव्या मानांकित सिंधूने सुरुवातीच्या दोन फेऱ्या जिंकण्यात यश मिळवले तर तिला तिसऱ्या मानांकित अॅन से यंगचा सामना करावा लागेल, त्यांचा भारताविरुद्ध 5-0 असा शानदार रेकॉर्ड आहे.