CORONA | कोरोनामुळे आर्थिक संकट, क्रिकेटपटूवर फूड डिलिव्हरी करण्याची वेळ
ट्विट करत या क्रिकेटपटूने आपली व्यथा मांडली आहे.
नेदरलॅंड : काही महिन्याभरापूर्वी देशासह जगभरात कोरोनाने (Corona Virus) थैमान घातलं. कोरोनामुळे सर्वत्र टाळेबंदी (Lockdown)करण्यात आली. या टाळेबंदीमुळे सर्वांचीच आर्थिक घडी फिस्कटली. काहींवर उपासमारीची वेळ ओढावली. क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाचा फटका बसला. अनेक स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या. तर काही स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या. यानिर्णयामुळे अनेक खेळाडूंनाही फटका बसला. नेदरलँडच्या एका क्रिकेटपटूवर कोरोनामुळे चक्क फूड डिलिव्हरी करण्याची नामुष्की ओढावली आहे. पॉल वॅन मिकेन असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. पॉल वॅन मिकेन ‘उबर ईट्स’ या फूड डिलिव्हरी कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोय त्याने याबाबत एक ट्विट करत आपली व्यथा मांडली आहे. Corona virus causes Netherlands cricketer Paul van Mekeren to serve as delivery boy for Uber Eats
काय म्हटलंय ट्विटमध्ये?
पॉलने आयसीसीचं ट्विट शेअर करत आपली व्यथा मांडली आहे. “खऱ्या अर्थाने आज क्रिकेट स्पर्धेा असायला हवी होती. पण आता भर हिवाळ्यामध्ये फूड डिलिव्हरी करावी लागतेय. गोष्टी भुरकन बदलतात, तेव्हा गम्मत वाटते, असो हसत रहा”, असं ट्विट करत पॉलने आपली व्यथा मांडली आहे.
Should’ve been playing cricket today ?? now I’m delivering Uber eats to get through the winter months!! Funny how things change hahaha keep smiling people ? https://t.co/kwVEIo6We9
— Paul van Meekeren (@paulvanmeekeren) November 15, 2020
कोरोनामुळे वर्ल्ड टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. जर आज जगभरात कोरोना परिस्थिती नसती, तर 15 नोव्हेंबरला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यात आला असता. मात्र कोरोनामुळे या वर्षी वर्ल्ड टी 20 स्पर्धा रद्द करण्यात आली. दरम्यान पुढील वर्षी म्हणजेच 2021 या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे. यामुळे भारताला या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे.
IPL 2020 यूएई
कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजनासाठी बीसीसआयने यूएई क्रिकेट बोर्डाला तब्बस 100 कोटी दिले. दरम्यान टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडून यूएई बोर्डाला ‘इतके’ कोटी
corona virus causes netherlands cricketer paul van mekeren to serve as delivery boy for uber eats