6 षटकार, 10 चौकार, धोनीच्या मित्राची तुफानी खेळी
सलग षटकार आणि चौकार पाहिले असतील. अशी कामगिरी अनेक क्रिकेटर्सनं केली देखील आहे. पण, एमएस धोनीच्या मित्रानं अशी तुफानी खेळी केलीय की त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली : सलग चौकार आणि षटकार मारणाऱ्यांबद्दल बोलायचं झाल्यास अनेक उदाहरणं समोर येतील. पण, कॅरेबियन प्रीमियर लीगदरम्यान (Caribbean Premier League) धोनीचा (MS Dhoni) मित्र फॉफच्या (Faf Du Plessis) बॅटनं अशी काही जादू केली आहे की त्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. फाफ डु प्लेसिसनं असं नेमकं काय केलं. फाफ हा खेळात काय आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. क्रिकेट म्हटलं की त्याच्या तुफानी खेळीच्या चर्चा आल्याच. पण, त्यानं आता केलेली कामगिरी आणि त्याची चर्चा रंगली आहे. यात एक व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. यातून तुम्हाला फाफचा अंदाज पुन्हा एकदा येईल.
धडाकेबाज खेळी
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं गुरुवारी इंग्लंडची तुफानी इनिंग खेळली. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज फाफ डू प्लेसिसनं बाबरला त्याच्या धडाकेबाज खेळीनं मागं टाकलंय. कॅरेबियन प्रीमियर लीगदरम्यान फॅफनं जी काही कामगिरी केलीय. त्याची चर्चा चांगलीच रंगील आहे.
विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हे पाहून घामही फुटला. त्याच्या बॅटमधून एकामागून एक मोठे शॉट्स येत राहिले आणि क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे बघत राहिला.
हा व्हिडीओ पाहा
What an innings!!! Faf brings up his 4th T20 century in emphatic style as this evenings @fun88eng Magic Moment. #CPL22 #GAWvSLK #CricketPlayedLouder #Fun88 #BiggestPartyInSport pic.twitter.com/eBZpOUusyM
— CPL T20 (@CPL) September 23, 2022
अर्धशतक, शतक
सीपीएलमध्ये गुरुवारी सेंट लुसिया किंग आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर यांच्यात सामना रंगला. कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जमध्ये धोनीचा मित्र असलेला फाफ सलामीला आला. त्यानं यावेळी लगेच दमदार खेळायला सुरुवात केली. त्यानं 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याचवेळी त्यानं 56 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीनं शतकही पूर्ण केलं.
फाफ 103 धावा करून ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर बाद झाला. या सामन्यात फॅफनं 174.57 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याची ही खेळी बाबर आझमपेक्षाही नेत्रदीपक ठरली आहे.