Video: ‘तो’ संपला असं सगळ्यांना वाटलं, टीममधून बाहेर केलं, आता एक ओव्हरमध्ये कुटल्या 2,4,4,2,7,6 6,

करिअर संपल्यात जमा आहे, असं बोललं जात होतं. त्याने अजूनही आपल्यात भरपूर क्रिकेट शिल्लक असल्याच दाखवून दिलय. एरॉन फिंचने स्फोटक बॅटिंग केली. मात्र, तरीही तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Video: 'तो' संपला असं सगळ्यांना वाटलं, टीममधून बाहेर केलं, आता एक ओव्हरमध्ये कुटल्या 2,4,4,2,7,6 6,
Cricket news Image Credit source: bcci twitter
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 9:57 AM

सिडनी – बिग बॅश लीगच्या एका सामन्यात एरॉन फिंचने एंड्रयू टायला बेकार धुतलं. टायच्या एका ओव्हरमध्ये फिंचने 2,4,4,2,7,6 6, तब्बल 31 धावा लुटल्या. एरॉन फिंचच करिअर संपल्यात जमा आहे, असं बोललं जात होतं. त्याने अजूनही आपल्यात भरपूर क्रिकेट शिल्लक असल्याच दाखवून दिलय. एरॉन फिंचने स्फोटक बॅटिंग केली. मात्र, तरीही तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियन स्टार एरॉन फिंच मेलबर्न रेनेगेड्सच नेतृत्व करतोय. लीगच्या 52 व्या सामन्यात फिंचने पर्थ स्कॉचर्सच्या बॉलर्सची जोरदार धुलाई केली. एंड्रयू टायच्या एका ओव्हरमध्ये त्याने धुमाकूळ घातला. 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या मेलबर्नला शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये 68 धावांची आवश्यकता होती.

लीगमधील सर्वात महागडी ओव्हर

हे सुद्धा वाचा

18 व्या ओव्हरमध्ये एंड्रयू टाय बॉलिंगसाठी आला. एरॉन फिंच स्ट्राइकवर होता. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर फिंचने 2 धावा काढल्या. पुढच्या 2 चेंडूंवर सलग 2 चौकार मारले. चौथ्या चेंडूवर फिंचने आणखी 2 धावा काढल्या. टायने आपल्या ओव्हरमध्ये 4 चेंडू टाकले होते. त्याची धुलाई बाकी होती. तो दबावाखाली आला होता. त्यामुळे त्याने टाकलेला पाचवा चेंडू नो बॉल ठरला. या नो बॉलवर फिंच थांबला नाही. फिंचने फुलटॉसवर अपर कट सिक्स मारला. फ्री हिटवर त्याने आणखी एक सिक्स मारला. टायची ओव्हरने त्याने सिक्स मारुन संपवली. टायची ही महागडी ओव्हर ठरली.

तुफानी इनिंगमध्ये किती फोर? किती सिक्स?

एका ओव्हरमध्ये फिंचने 31 धावा ठोकल्या. फिंचच्या आक्रमक पवित्र्याने बिथरलेल्या एरॉन हार्डीने पुढच्याच बॉलवर सदरलँडचा कॅच सोडला. फिंचने 35 चेंडूत नाबाद 76 धावा चोपल्या. या तुफानी इनिंगमध्ये त्याने 7 फोर आणि 5 सिक्स मारले. मात्र, तरीही तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. मेलबर्नच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 202 धावा केल्या. त्यांनी 10 रन्सनी हा सामना गमावला. फिंच ऑस्ट्रेलियन टीममधून बाहेर

फिंचने मागच्यावर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच नेतृत्व केलं. टुर्नामेंटच्या मध्यावर त्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याचं करिअर संपल्याच जमा असल्याच बोलल जात होतं. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातून त्याला बाहेर करण्यात आलं. तेव्हापासून ऑस्ट्रेलियन टीममध्ये तो पुनरागमन करु शकलेला नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.