Asia Cup 2024: आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया-पाकिस्तान सामना केव्हा?

Asia Cup T20 2024: टीम इंडिया आणि पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने असणार आहे. एसीसीने आशिया कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Asia Cup 2024: आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया-पाकिस्तान सामना केव्हा?
ind vs pak flag cricket
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 5:18 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. एकूण 4 संघांमध्ये 27 जूनपासून सेमी फायनलला सुरुवात होणार आहे. तर 29 जून रोजी महाअंतिम सामना पार पडणार आहे. त्याआधी आशियाई क्रिकेट परिषद अर्थात एसीसीने वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहे. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेचा 10 दिवस थरार रंगणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे 19 ते 28 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा श्रीलंकेला मिळाला आहे.

यजमान श्रीलंकेसह या स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, यूएई, मलेशिया आणि थायलंड हे संघ या स्पर्धेत भिडणार आहेत. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ आहेत. तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंडचा समावेश आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3 सामने खेळणार आहे. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. त्यानंतर फायनल सामना होईल आणि आशिया किंग संघ मिळेल.

मौका मौका

दरम्यान वूमन्स आशिया कप स्पर्धेमुळे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ असलेले टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्याची साऱ्या क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असते. हा बहुप्रतिक्षित सामना 19 जुलै रोजी होणार आहे. टीम इंडियाच हाच पहिला सामना असणार आहे. त्यानंतर टीम इंडिया यूएई आणि नेपाळ विरुद्ध भिडणार आहे.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

विरुद्ध पाकिस्तान, संध्याकाळी 7 वाजता

विरुद्ध यूएई, दुपारी 2 वाजता

विरुद्ध नेपाळ, संध्याकाळी 7 वाजता

सेमी फायनल 26 जुलै

फायनल 28 जुलै

टीम इंडियाचे सामने कुठे होणार?

टीम इंडिया कुठे काय करतेय?

दरम्यान वूमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळत आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला वनडे सीरिजमध्ये 3-0 ने क्लिन स्वीप दिला. त्यानंतर आता 28 जून ते 1 जुलै दरम्यान एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. तर 5, 7 आणि 9 जुलै रोजी टी 20 मालिकेतील 3 सामने पार पडतील. त्यानंतर टीम इंडिया आशिया कप स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.