AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gambhir Sreesanth Fight : श्रीसंतला फिक्सर म्हणल्यामुळे गंभीरवर होणार कारवाई? श्रीसंतने खरं काही सांगून टाकलं

Gambhir Sreesanth Fight : गौतम गंभीर आणि श्रीसंत दोघांनाही विरोधी संघांवर तुटून पडताना आपण पाहिलं. जेव्हा ते दोघे आमनेसामने आल्याने क्रिकेट वर्तुळात याची चर्चा होत आहे. भर सामन्यात गंभीर श्रीसंतला फिक्सर म्हणाल्याने त्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Gambhir Sreesanth Fight : श्रीसंतला फिक्सर म्हणल्यामुळे गंभीरवर होणार कारवाई? श्रीसंतने खरं काही सांगून टाकलं
| Updated on: Dec 07, 2023 | 7:18 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्या झालेल्या राड्याची देशभरात चर्चा आहे. गौतम गंभीर निवृत्त झाला असला तरी एखाद्या तरूण नव्या दमाच्या खेळाडूसारखा भांडताना दिसला. बुधवारी सूरतमध्ये लीजेंड लीगमधील इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये हा राडा पाहायला मिळाला. या वादानंतर एस श्रीसंत याने व्हिडीओ शेअर केले असून त्याामध्यी नवनवीन खुलासे केले आहेत. या वादानंतर सर्वांना प्रश्न पडला होता की गौतम गंभीर श्रीसंतला नेमकं काय म्हणाला? श्रीसंतने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत याचाही खुलासा केला आहे.

काय म्हणाला एस श्रीसंत?

या वादावेळी गौतम गंभीर मला फिक्सर म्हणत होता त्यासोबतच त्याने मला शिवीगाळ केली होती. यावर मी त्याला वारंवार इतकंच विचारत होती की, तु मला फिक्सर फिक्सर का बोलत आहे. पण तो मला फिक्सर बोलत शिवीगीळ करत असल्याचं श्रीसंतने लाईव्ह येत सांगितलं आहे. इतकंच नाहीतर पंचासमोर मला गंभीर फिक्सर बोलत असल्याचंही श्रीसंत म्हणाला.

आधीच्या व्हिडीओममध्ये काय म्हणालेला श्रीसंत?

काही कारण नसताना तो माझ्याशी भांडला असून तो जे काही बोललाय ते खूप वाईट होतं. तशा प्रकारे गंभीरने माझ्याशी बोलायला नव्हतं पाहिजे. संघातील वीरेंद्र सेहवागसह इतर सहकाऱ्यांचाही तो आदर करायचा नाही. जेव्हा शोवळी गंभीरला विराटबद्दल विचारलं जातं तेव्हा तो त्याच्याबद्दल बोलत नाही. जर तुम्ही संघातील खेळाडूंचा आदर करू शकत नसाल तर लोकांचं प्रतिनिधित्त्व करण्याला काय अर्थ असल्याचं श्रीसंतने म्हटलं होतं.

दरम्यान, 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्याला क्लीन चीट दिली असून तो देशांतर्गत क्रिकेट, लीजेंड लीगमध्ये खेळत आहे. गंभीर फिक्सर बोलल्याने त्याच्यावर काही कारवाई होते का? याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.