AFG vs PAK 2nd Odi | Babar Azam भर मैदानात संतापला, व्हीडिओ व्हायरल
Babar Azam Angry Video | पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करत मालिका जिंकली, मात्र कॅप्टन बाबर आझम याला भर मैदानात भडकायला काय झालं?
हंबनटोटा | अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात गुरुवारी 24 ऑगस्ट रोजी वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. पाकिस्तानने हा सामना 1 बॉल आणि 1 विकेट राखून जिंकला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेलं 301 धावांचं आव्हान पाकिस्तानने 49.5 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पाकिस्तानने या विजयासह मालिका जिंकली आणि 2-0 अशी आघाडीही घेतली. पाकिस्तानकडून 301 धावांचं पाठलाग करताना इमाम उल हक याने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. शादाब खान याने 48 धावा केल्या. फखर झमान याने 30 रन्सचं योगदान दिलं. तर कॅप्टन बाबर आझम याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. बाबरने 66 चेंडूच्या खेळीत 6 चौकार ठोकले. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानने आशिया कपआधी सीरिज जिंकली.
सामना आणि मालिका जिंकल्यामुळे पाकिस्तान टीममध्ये भलताच आनंद होता. मात्र कॅप्टन बाबर आझम याच्या अंगात विराट कोहली याचं भूत शिरलं होतं. बाबर आझम नक्की का संतापला, नक्की काय झालं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. पाकिस्तानने 301 धावांचा पाठलाग करताना सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचला. सामन्यातील शेवटची ओव्हर अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी याने टाकली. फजलहक याने 50 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या शादाब खान याला मंकडिंग केलं.
सामना रंगतदार स्थितीत असताना फझलहकने निर्णायक क्षणी समयसूचकता दाखवून शादाबला 48 धावांवर रोखलं. त्यामुळे पाकिस्तानच्या गोटात निराशेचं वातावरण पाहायला मिळालं. इतकं होऊनही अफगाणिस्तान विजयी होण्यात अपयशी ठरली. पाकिस्तानच्या नसीम शाह याने पाचव्या बॉलवर फोर ठोकत पाकिस्तानला विजयी केलं. नसीमने बॅट फेकून जल्लोष केला. तर ड्रेसिंग रुममधील पाकिस्तानचे खेळाडूही रुबाबात मैदानात धावत आले.
बाबर आझम भडकला
I have never seen Babar this angry🔥🥹.#BabarAzam #PAKvAFG #AFGvPAK #PakvsAfg pic.twitter.com/D21z33y9JD
— Shaharyar Ejaz 🏏 (@SharyOfficial) August 24, 2023
तर इथे बाबर संतापलेला. बाबर रागाने लालेलाल झालेला. बाबर नसीम शाह आणि इतर खेळाडूंसोबत बोलला. बाबरचा हा व्हीडिओ व्हायरल झालाय. शादाब खान याला मंकडिंग केल्याने बाबर भडकल्याचं म्हटलं जात आहे. दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करत होते. बाबर आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी हस्तांदोलनादरम्यान समोरासमोर आले. तेव्हा बाबरने नबीला थांबवलं. बाबरने मोहम्मद रिजवान आणि नसीम शाह या दोघांना काहीतरी सांगितलं. दरम्यान बाबरचा हा अवतार पाहून क्रिकेट चाहत्यांनाही झटका बसलाय.
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि शाहीदुल्ला कमाल.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ.