AFG vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, या खेळाडूचं कमबॅक

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना ओल्या मैदानामुळे वाया गेला आहे. चौथ्या दिवसाचा खेळही होऊ शकलेला नाही. असं असताना दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे.

AFG vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, या खेळाडूचं कमबॅक
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 4:46 PM

अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्या तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. दोन्ही देशांमध्ये पहिला वनडे सामना 18 सप्टेंबरला, दुसरा वनडे सामना 20 सप्टेंबरला आणि तिसरा वनडे सामना 22 सप्टेंबरला होणार आहे. ही मालिका युएईतील शारजाह क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. आतापर्यंत उभय देशांमध्ये दोन वनडे सामने खेळले गेले असून दोन्ही सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला आहे. पण या दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका होत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्वा हशमतुल्लाह शाहिदीच्या हाती दिलं असून राशीद खानने संघात कमबॅक केलं आहे. राशीद खानने एक वर्षे कसोटी क्रिकेट खेळणार नसल्याचं आधीच जाहीर केलं आहे.

अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम जादरान दुखापतीमुळे मालिकेला मुकला आहे. तर फिरकीपटू मुजीब उर रहमान देखील दुखापतग्रस्त असल्याने स्पर्धेत खेळत नाही. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या फलंदाज अब्दुल मलिकला संघात स्थान मिळालं आहे. जादरानच्या जागी त्याला संघात घेतलं आहे. तर 7 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या दरविश रसूलीला संघात स्थान मिळालं आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान यांनी सांगितलं की, ‘आमच्या क्रिकेट इतिहासात दक्षिण अफ्रिकेसाठी यजमानपद भूषवण्याची संधी मिळत आहे. तो एक चांगला संघ आहे. त्यांच्यासोबत वनडे मालिका खेळण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमच्या संघाने मागच्या दोन तीन वर्षात आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे द्विपक्षीय मालिकेतही तशीच कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे.’ अफगाणिस्तानने मागच्या वनडे मालिकेत आयर्लंडला 2-0 ने पराभूत केलं होतं.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ

हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), रहमत शाह, अब्दुल मलिक, रियाज हसन, दरवेश रसूली, इकराम अलीखिल, गुलबदीन नइब, मोहम्मद नबी, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, नांग्याल खरोती, एएम गजनफर, फजल हक फारूकी, फरीद मलिक नवीद जादरान, बिलाल सामी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.