Team India: वनडे वर्ल्ड कप आधी टीम इंडियासाठी मोठी आनंदाची बातमी
ODI World Cup 2023: वनडे वर्ल्ड कप आधी (ODI World Cup 2023) टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. वनडे वर्ल्ड कप यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
ODI World Cup 2023 : भारतात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कप टुर्नामेंट लक्षात घेऊन, सर्वच टीम्स आपल्या खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेसवर नजर ठेऊन आहेत. आयपीएल 2023 दरम्यान टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असलेला एक खेळाडू अखेर फॉर्ममध्ये परतला आहे. हा खेळाडू टीमच्या मोठ्या मॅचविनर पैकी एक आहे.
काय आहे ती आनंदाची बातमी?
टीम इंडिया यावर्षी आपल्या घरातच वनडे वर्ल्ड कप खेळणार आहे. भारतीय फॅन्सना टीम इंडियाकडून भरपूर अपेक्षा आहेत. टीम इंडियाने याआधी 2011 साली मायदेशात झालेला वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. या मोठ्या टुर्नामेंटआधी भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतलाय. मागच्या काही महिन्यांपासून रोहित शर्माच्या बॅटमधून मोठी इनिंग पहायला मिळाली नव्हती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात तो कॅप्टन इनिंग खेळला. भारतीय टीमच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.
24 इनिंगनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक
टीम इंडियासोबतच मुंबई इंडियन्ससाठी सुद्धा रोहित शर्माच फॉर्ममध्ये येणं आवश्यक होतं. रोहित शर्माच्या बॅटमधून आयपीएलच्या 24 इनिंगनंतर अर्धशतक आलय. याआधी रोहित शर्माने वर्ष 2021 मध्ये आयपीएलमध्ये 50 रन्सचा आकडा पार केला होता. रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 45 चेंडूत 65 धावा केल्या. रोहितने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. मुंबईचा पहिला विजय
आयपीएल 2023 मध्ये अखेर मुंबई इंडियन्सने आपला पहिला विजय मिळवलाय. मुंबई इंडियन्सला सीजनच्या पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दिल्ली कॅपिटल्सला हरवून मुंबई इंडियन्सने सीजनमधला पहिला विजय मिळवलाय. रोहित शर्मा टीमच्या विजयाचा हिरो ठरला.